पालघरमधील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी इरफान खानच्या मुलाने तातडीने केली मदत

दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान हा त्याच्या परोपकारी कृत्यामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याच्या कामाचं कौतुक होतंय. पालघरमधील जव्हार तालुक्यात पाणी टंचाईविरोधात काम करणाऱ्या युट्यूबरला त्याने तातडीने आर्थिक मदत केली.

पालघरमधील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी इरफान खानच्या मुलाने तातडीने केली मदत
Irrfan Khan with son Babil KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 3:04 PM

दिवंगत अभिनेता इरफान खानने आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. इरफानचं कॅन्सरने निधन झालं. त्याचा मुलगा बाबिलसुद्धा वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात काम करतोय. आता बाबिलच्या स्वभावानेही नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. युट्यूबर प्रेम कुमारला त्याने 50 हजार रुपयांची देणगी दिली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात पाणी टंचाईविरोधात हा युट्यूबर काम करत आहे. त्याच्यासाठी त्याने ही देणगी दिली. एका पापाराझी अकाऊंटवर बाबिलचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तो युट्यूबरच्या अकाऊंटमध्ये फोनद्वारे पैसे ट्रान्सफर करताना दिसून येत आहे. “माझं नाव लिहिण्याची गरज नाही, तू चांगलं काम करतोय”, असं बाबिल त्या युट्यूबरला म्हणतो.

बाबिलच्या या परोपकारी कृत्याचं नेटकऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे. ‘खूप चांगलं काम करतोय तू. देव तुझं भलं करो’, असं एकाने लिहिलं. तर ‘हा वडिलांसारखाच उदार मनाचा आहे’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने कौतुक केलं. विशेष म्हणजे बाबिलने ज्यादिवशी ही देणगी दिली, त्याच तारखेला म्हणजेच 29 एप्रिल रोजी त्याचे वडील इरफान खान यांचं निधन झालं होतं. वडिलांच्या स्मृतिदिनी बाबिलने त्यांचे काही फोटो पोस्ट करत भावनिक पोस्ट लिहिली होती. “तुम्ही मला योद्धा म्हणून लढायला शिकवलं पण प्रेम आणि विनम्र स्वभावाने. तुम्ही मला आशेबद्दल आणि लोकांसाठी लढायला शिकवलं. तुमचे चाहते नाहीत तर तुमचं कुटुंबच आहे. मी तुम्हाला वचन देतो की आपल्या लोकांसाठी आणि कुटुंबासाठी मी लढेन. मी हार मानणार नाही”, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वीच बाबिलची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली होती. ‘कधी कधी मला असं वाटतं की सर्वकाही सोडून द्यावं आणि बाबांकडे निघून जावं’, असं त्याने लिहिलं होतं. ही पोस्ट वाटून अनेकांनी त्याच्याविषयी काळजी व्यक्त केली होती. बाबिलने अशी निराशाजनक पोस्ट का लिहिली आणि बाबांकडे जाण्याविषयी का म्हटलंय, असा प्रश्न अनेकांनी विचारला होता.

बाबिलने ‘कला’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ‘द रेल्वे मॅन’ या वेब सीरिजमधील त्याच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. यामध्ये त्याने आर. माधवन, के. के. मेनन, दिव्येंदु यांच्यासोबत भूमिका साकारल्या होत्या. लवकरच तो शूजित सरकारच्या ‘द उमेश क्रॉनिकल्स’मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

Non Stop LIVE Update
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.