जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, मनी लाँडरिंग प्रकरणात 5 तासापासून सुरु आहे ईडीची चौकशी

जॅकलीन सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. सध्या ती भूत पोलीस या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर आणि एक गाणे रिलीज करण्यात आले आहे आणि दोघांनाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, मनी लाँडरिंग प्रकरणात 5 तासापासून सुरु आहे ईडीची चौकशी
जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, मनी लाँडरिंग प्रकरणात 5 तासापासून सुरु आहे ईडीची चौकशी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस(Jacqueline Fernandez)च्या अडचणीत वाढ झाली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी (अंमलबजावणी संचालनालय) जॅकलीनची दिल्लीत 5 तासापासून चौकशी करत आहे. अहवालांनुसार, हा खटला सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित आहे, ज्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा आधीच नोंदवण्यात आला आहे. रोहिणी तुरुंगात अंडर ट्रायल सुकेशवर एका व्यावसायिकाकडून एका वर्षात 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. याशिवाय सुकेशच्या विरोधात खंडणीच्या 20 स्वतंत्र तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. (Jacqueline Fernandez’s troubles escalate, ED money laundering case under investigation for 5 hours)

जॅकलीन सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. सध्या ती भूत पोलीस या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर आणि एक गाणे रिलीज करण्यात आले आहे आणि दोघांनाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात जॅकलिनसोबत अर्जुन कपूर, सैफ अली खान आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत.

बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी श्रीलंकेहून आली होती

बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी जॅकलिन श्रीलंकेहून आली होती. 2009 मध्ये जॅकलिनने अलादीन या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात जॅकलिनसोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही, पण अभिनेत्रीच्या सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर, ‘जाने कहा से आयी है’ या चित्रपटात दिसली. तथापि जॅकलिनला हाऊसफुल चित्रपटातील धन्नो गाण्यामुळे लोकप्रियता मिळाली. यानंतर मर्डर 2 मध्ये जॅकलिनने तिच्या हॉट अवताराने सर्वांना हैराण केले. त्यानंतर जॅकलिनच्या करिअरचा आलेख वाढतच गेला. यानंतर जॅकलिनने हाऊसफुल 2, रेस 2, किक सारखे हिट चित्रपट दिले.

वैयक्तिक आयुष्यामुळे जॅकलिन चर्चेत

जॅकलिनने बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली, जेव्हा तिचे साजिद खानसोबत नाव जोडले होते, तेव्हा त्यांच्या नात्याची चर्चा खूप रंगली होती. एवढेच नाही तर दोघेही अनेक पार्टी आणि लंच किंवा डिनर डेट्सला जायचे. पण नंतर अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली. तथापि, दोघांनीही कधीही ब्रेकअपवर टिप्पणी केली नाही. जॅकलिन सध्या तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. (Jacqueline Fernandez’s troubles escalate, ED money laundering case under investigation for 5 hours)

इतर बातम्या

Video | चिमुकली राधा कृष्णावर रुसली, मजेदार डान्स सोशल मीडियावर व्हायरल

आमची ईडी लागली, तुमची सीडी लावा; गिरीश महाजनांनी खडसेंना डिवचले

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI