अखेर ‘त्या’ गोष्टीवर जया बच्चन यांच्याकडून मोठा खुलासा, म्हणाला, ऐश्वर्या राय आणि अमिताभ…
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आलीये.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे एक मोठा काळ ऐश्वर्या रायने बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय ही काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वाद टोकाला गेल्याचेही सांगितले जातंय. ऐश्वर्या रायने अभिषेकचे घर सोडल्याचे सांगितले जात असून मध्यंतरी काही फोटोही व्हायरल होताना दिसले. सतत घटस्फोटाच्या चर्चा असताना यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये.
मध्यंतरी जया बच्चन यांनी ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला होता. जया बच्चन म्हणाल्या की, ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये एक खूप चांगले नाते आहे. ज्यावेळी ऐश्वर्या राय ही घरात येते त्यावेळी त्यांना घरात श्वेता आल्यासारखेच वाटते. ऐश्वर्या घरात असते, त्यावेळी अमिताभ खूप आनंदी असतात, त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते.
ऐश्वर्या राय हिची काळजी अमिताभ बच्चन यांनी एका मुलीसारखी घेतलीये. ऐश्वर्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी देखील अमिताभ घेतात, असेही जया बच्चन यांनी म्हटले आहे. ऐश्वर्या ही देखील अमिताभ यांच्यावर एखाद्या वडिलांसारखे प्रेम करते. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यातील नाते अजूनही चांगले असल्याचे सांगितले जाते.
काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न झाले. या लग्नाला अमिताभ बच्चन, श्वेता बच्चन, अभिषेक बच्चन, जया बच्चन, नव्या नवेली नंदा, अगस्त्य नंदा हे सर्वजण एकत्र पोहोचले होते. मात्र, दुसरीकडे ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिच्यासोबत पोहोचली होती. तेंव्हापासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा अधिकच रंगताना दिसत आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी 20 एप्रिल 2007 मध्ये लग्न केले. अगोदर काही वर्ष हे एकमेकांना डेट करत होते. अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खान याला डेट करत होती. यांचे लग्न होईल असे सर्वांनाच वाटत असताना दोघांचे रस्ते वेगळे झाले. आता ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट नेमका का होतोय, याबद्दल तसा खुलासा हा होऊ शकल नाहीये.
