AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaya-Amitabh Bachchan : अमिताभ यांच्या वागणुकीमुळे जया बच्चन वैतागल्या, सर्वांसमोरच केली पोलखोल !

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि बच्चन कुटुंबाबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. अमिताभ हे बऱ्याचदा त्यांच्या आयुष्यातले किस्से शेअर करत असतात. पण त्यांच्या एका सवयीमुळे त्यांची पत्नी, जया बच्चन या त्रस्त असून एकदा त्यांनी सर्वांसमोरच अमिताभ यांची त्रासदायक सवय सांगितली होती. ते ऐकून सर्वच अवाक् झाले तर अमिताभ यांच्या तोंडून शब्दही फुटेना..

Jaya-Amitabh Bachchan : अमिताभ यांच्या वागणुकीमुळे जया बच्चन वैतागल्या, सर्वांसमोरच केली पोलखोल !
जया बच्चन - अमिताभ बच्चन
| Updated on: Nov 05, 2025 | 10:06 AM
Share

Amitabh Bachchan : 83 वर्षांचे अमिताभ बच्चन हे या वयातही खूप उत्साहाने , जोमाने काम करत असतात. मोठ्या पडद्यावर आलेला एखादा चित्रपट असो किंवा कौन बनेगा करोडपतीसारखा एखादा शो.. ते सतत कामातच गुंतलेले असतात. सतत चर्चेत असलेले बिग बी आणि बच्चन कुटुंबीय यांच्या खासगी आयुष्याकडेही लोकांचं खूप लक्ष असतं, त्यांचे अनेक किस्सेही बरेच लोकप्रिय आहेत. अमिताभ यांच्या प्रेमकहाणीपासून ते त्यांनी जिंकलेले पुरस्कार, हा संपूर्ण प्रवास खूप खास असून लोकांनाही त्याबद्दल सर्व काही जाणून घेण्याची उत्सुकता असते. पण हे बऱ्याच कमी लोकांना माहीत असेल की अभिनेत्री आणि अमिताभ यांची पत्नी जया बच्चन यांना मात्र बिग बी यांच्याबद्दल तक्रार आहे. बिग बी यांच्या सवयीमुळे त्या खूप वैतागतात आणि याचा खुलासा जया यांनी सर्वांसमोरच केला होता. मात्र ते ऐकून महायनक देखील त्यांच्या बचावार्थ काहीच बोलू शकले नव्हते.

काय होती जया बच्चन यांची तक्रार ?

अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे सगळेच फॅन आहेत, त्यांचं सूत्रसंचालन सर्वांनाच आवडतं. याच शोमध्ये जया यांनी अमिताभ यांची वाईट सवय सांगत तक्रार केली होती. ‘कौन बनेगा करोडपति’ च्या एका जुन्या एपिसोडमध्ये जया बच्चन या व्हिडीओ कॉलद्वारे जोडल्या गेल्या होत्या. त्या भागात त्यांची लेक श्वेता बच्चन आणि नात नव्या नंदा या स्पेशल गेस्ट म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्या एपिसोडमध्ये फुल्ल फॅमिली व्हाईब येत होती. तिथलं वातावरण अगदी कौटुंबिक झालं होतं. मात्र तेव्हाच सर्व प्रेक्षकांसमोर जया यांनी अमिताभ यांची तक्रार केली.

जया म्हणाल्या, ‘ प्रेक्षकांनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे. यांच्याकडे (अमिताभ) 2 नव्हे तर चांगले 5-7 फोन आहेत.. पण तुम्ही त्यांना फोन केला तर ते कधीच पोन उचलत नाहीत. आणि त्यानंतर जर एखादी गंभीर घटना घडली असेल तर ते आमच्यावरच रागावतात’ असं जया बच्चन म्हणाल्या. ‘ मला फोन का नाही केला, घरी एवढं सगळं रामायण झालं, मला काहीच सांगत नाही तुम्ही लोक.. असं म्हणत ते आम्हालाच ओरडतात’ असं जया म्हणाल्या. अरे पण यांना सांगणार तरी कसं ? असा सवालही जया यांनी विचारला.

4 तासांनी अमिताभ यांनी केला रिप्लाय

यादरम्यान, नव्या नंदानेही तिच्या आजीचं समर्थन करत त्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला. तेव्हाच नव्याने एक प्रसंग सांगितला, ती म्हणाली की एकदा तिची आजी विमानाने प्रवास करत होती आणि तिने ग्रुपमध्ये त्याबद्दल मेसेज केला होता. त्यावर सर्वांनी रिप्लाय करत हॅपी जर्नी अशा शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर जया यांचं विमान उतरलं, सर्वांनी म्हटलं ‘वेलकम होम.’. त्यानंतर आजी घरी आली, जेवण वैगरे झालं. मात्र एवढ्या सगळ्यानंतर 4 तासांनी आजोबांचा ( अमिताभ बच्चन) यांचा रिप्लाय आला की ‘ओके जया सेफ फ्लाइट.’ हे ऐकून सगळे जण हसायला लागले. मात्र तेव्हाच अमिताभ यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांची लेक, नात आणि पत्नी यांच्यासमोर ते खरंच काही बोलू शकले नाहीत.

नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.