AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बकवास चित्रपट.. अभिषेकचा चित्रपट बघताच भडकल्या जया बच्चन, थेट चित्रपटगृहातच..

जया बच्चन कायमच चर्चेत असणारे नाव आहे. अनेकदा त्यांचे रागातले व्हिडीओ व्हायरल होतात. जया बच्चन यांना एकदा राग आला की, त्या कोणालाच सोडत नाहीत. यादरम्यानच एक धक्कादायक खुलासा झाला. थेट जया बच्चन रागात अर्धवट चित्रपट सोडून निघाल्या.

बकवास चित्रपट.. अभिषेकचा चित्रपट बघताच भडकल्या जया बच्चन, थेट चित्रपटगृहातच..
Jaya Bachchan
| Updated on: May 12, 2026 | 2:40 PM
Share

जया बच्चन कायमच चर्चेत असतात. जया बच्चन त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. एखादी गोष्ट त्यांना पटली नाही तर त्या अजिबातच खपून घेत नाहीत. तोंडावर बोलतात. त्यांचे विचार मांडताना त्या अजिबात मागे पुढे पाहत नाहीत. एक धक्कादायक प्रकार घडला. जया बच्चन यांनी आपल्या मुलाला देखील सोडले नाही. अभिषेक बच्चन याचा चित्रपट पाहून त्यांनी थिएरट सोडले. चित्रपट सुरू असतानाच त्यांनी तमाशा घातला. त्यानंतर त्यांनी थेट शाहरूख खान याचाच जोरदार क्लास लावला. हॅपी न्यू इयर चित्रपटावेळी एक मोठी घटना घडली होती. हॅपी न्यू इयर चित्रपटात अभिषेक बच्चन महत्वाच्या भूमिकेत होता. स्पेशल स्क्रीनिंगसाठी जया बच्चन थिएटरमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत पोहोचल्या होत्या. मात्र, चित्रपट पाहत असतानाच त्यांचा पारा चढला. हेच नाही तर त्यांनी मधल्या ब्रेकमध्येच मोठा गोंधळ घातला.

यादरम्यान त्यांनी थेट शाहरूख खानला सुनावले. मुर्खपणा आहे का? हा चित्रपट किती बकवास आहे. यातून लोकांना काय मेसेज जातो? जया बच्चन यांनी मोठा तमाशा थिएरटमध्ये घालण्यास सुरूवात केली. जया बच्चन यांचे लूक पाहून अमिताभ बच्चनही धक्क्यात होते. यादरम्यान सर्वात संयम दाखवला तो म्हणजे शाहरूख खानने. जया बच्चन यांनी नाही ते बोलले पण शाहरूख खान फक्त ऐकून येण्याच्या भूमिकेत होता. त्याने अजिबात काहीच उत्तर दिले नाही.

शेवटी त्याने जया आंटी हा चित्रपट कोणताही संदेश देण्यासाठी नसल्याचे म्हटले. याबाबत अभिनेते मोहन कपूर यांनी एका मुलाखतीत या घटनेबद्दल खुलासा केला. हेच नाही तर यादरम्यान जया बच्चन यांचा पारा इतका जास्त चढला होता की, त्या संपावून चित्रपट अर्धवट सोडून रागात निघून गेल्या होत्या. जया बच्चन यांना हा चित्रपट अजिबातच आवडला नाही.

या चित्रपटाने 397 कोटींचा गल्ला केला होता. मोठी तगडी स्टारकास्ट होती. मात्र, जया बच्चन यांना हा चित्रपट अजिबातच आवडला नव्हता. जया बच्चन रागात अर्धवट चित्रपट सोडून घरी गेल्या. मात्र, यावेळी अनेक दिग्गज उपस्थित होते. मात्र, त्यांच्यापैकी त्यांना कोणीही रोखू शकले नाही. अभिषेक बच्चनही शांतपणे उभा होता. शाहरूख खान याने अजिबातच विचार केला नव्हता की, आपल्या जवळच्या मित्राचीच आई आपल्याला असे काही बोलेल.

Follow Us
NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर...
NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर....
आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा
आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा.
ठाण्याचंही नाव आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय...
ठाण्याचंही नाव आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय....
मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंचा सवाल!
मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंचा सवाल!.
...म्हणून याला भाजप कारणीभूरत, NEET पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींची...
...म्हणून याला भाजप कारणीभूरत, NEET पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींची....
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये... NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये... NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड.
सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो?
सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो?.
भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या..
भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या नव्या यादीवरून वाद, प्रफुल पटेल यांना डावललं?
राष्ट्रवादीच्या नव्या यादीवरून वाद, प्रफुल पटेल यांना डावललं?.