तारक मेहता मालिकेत सोनू परत येणार? अत्यंत मोठी अपडेट, पुन्हा…
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून जुने कलाकार मालिकेला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. त्यामध्येच झील मेहता ही मालिकेत परतणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. त्यावर झील मेहता हिने उत्तर दिले आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती या मालिकेचा चाहता आणि प्रेक्षक आहे. सहकुटुंब बसूनही ही मालिका आपण बघू शकतो. मात्र, गेल्या काही वर्षात तारक मेहता मालिकेतील जुने कलाकार मालिका सोडून जात आहेत. प्रत्येक कलाकाराचे मालिका सोडून जाण्याचे कारण वेगळे असले तरीही आता हातावर मोजण्या इतके जुने कलाकार मालिकेत राहिले आहेत. नवीन चेहरे जास्त दिसत आहेत. त्यामध्येच काहींनी मालिका सोडल्यानंतर गंभीर आरोप देखील केली. तारक मेहता मालिकेतील सर्वात प्रसिद्ध जोडी म्हणजे दयाबेन आणि जेठालालची. मात्र, दयाबेनही काही वर्षांपासून मालिकेपासून तशी दूर आहे. आजही प्रेक्षक दयाबेनची प्रतिक्षा करत आहे. मात्र, दयाबेन अर्थात दिशा वकानी मालिकेत कधी परतणार हे असित कुमार मोदी यांना देखील माहिती नाही.
तारक मेहता मालिकेतील सर्वांचा आवडता विषय म्हणजे टप्पू सेना आहे. आता टप्पू सेना मोठी झाली असून टप्पू सेनामधील अनेक कलाकारांनी मालिकेला रामराम केला. आत्माराम तुकाराम भिडे आणि माधवी यांची मुलगी सोनू ही टप्पू सेनाचा महत्वाचा भाग आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोनूची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्ये सतत बदल होताना दिसत आहे.
मालिका सुरू झाल्यापासून ते अनेक वर्षांपर्यंत सोनूची भूमिका झील मेहता हिने साकारली. मात्र, त्यानंतर तिने मालिकेचा निरोप घेतला. झील मेहता हिने मालिका सोडल्यानंतर अनेकांनी सोनूची भूमिका साकारली. मात्र, प्रेक्षकांनी कायमच पहिल्याच सोनूवर प्रेम केले. नुकताच झील मेहता हिला परत तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत जाण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून झील मेहता पुन्हा एकदा तारक मेहता मालिकेत येणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर आता झील मेहता ही स्पष्ट बोलताना दिसली. झील मेहता म्हणाली की, नाही मी असे नाही करू शकत… यासोबतच झील मेहता हिने एक दिलही शेअर केला. यावरून समजते की, झील मेहता हिच्यासाठी तारक मेहता मालिका किती जास्त महत्वाची आहे.
