वयाच्या ७० व्या वर्षी अभिनेत्याने चौथ्यांदा थाटला संसार; म्हणाला, ‘वन नाइट स्टँड नव्हतं, प्रत्येक लग्न…’
वयाच्या ७० व्या वर्षी अभिनेता 29 वर्ष लहान तरुणीसोबत अडकला विवाहबंधनात; होत असलेला विरोध पाहता सडेतोड उत्तर देत अभिनेता म्हणाला ‘वन नाइट स्टँड नव्हतं, प्रत्येक लग्न…’

मुंबई | बॉलिवूडमध्ये कायम सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. ज्यामुळे सेलिब्रिटींना अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागतो. पण होणाऱ्या विरोधाचा आणि रंगणाऱ्या चर्चांना अधिक महत्त्व न देता अनेक सेलिब्रिटींनी फक्त आणि फक्त त्यांच्या भावनांना महत्त्व दिलं. बॉलिवूडच्या एक प्रसिद्ध अभिनेत्याने तर वयाच्या ७० व्या वर्षी चक्क २९ वर्ष लहान तरुणीसोबत लग्न केलं. ज्यामुळे तुफान चर्चा रंगल्या. एवढंच नाही तर अभिनेत्याच्या लेकीने देखील वडिलांच्या लग्नाचा विरोध केला आणि सावत्र आईवर निशाणा साधला.. सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेते कबीर बेदी आहेत. सध्या सर्वत्र कबीर बेदी आणि त्यांच्या चार लग्नांबद्दल चर्चा रंगत आहे.
कबीर बेदी यांचं पहिलं लग्न १९६९ साली प्रोतिमा बेदी यांच्यासोबत झालं. १९७४ मध्ये प्रोतिमा आणि कबीर यांनी घटस्फोट घेतला आणि विभक्त झाले. त्यानंतर कबीर यांनी दुसरं लग्न मूळची ब्रिटीश असणाऱ्या फॅशन डिझायनर सुजान हम्प्रेज यांच्या सोबत केलं.
कबीर बेदी यांचं दुसरं लग्न देखील अपयशी ठरलं. त्यानंतर १९९२ साली तिसरं लग्न केलं. टीव्ही आणि रेडियो प्रेजेंटर निक रिड्ससोबत केलं. पण कबीर बेदी यांचं तिसरं लग्नात देखील अपयशी ठरलं.. अखेर तिसऱ्या पत्नीसोबत देखील त्यांनी घटस्फोट घेण्याचा विचार केला विभक्त झाले.
२००५ मध्ये तिसऱ्यांदा घटस्फोट झाल्यानंतर कबीर यांनी २०१६ मध्ये परवीन यांच्यासोबत चौथं लग्न केलं. जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर कबीर बेदी आणि परवीन यांना २०१६ मध्ये लग्न केलं. चार लग्न केल्यामुळे कबीर बेदी यांना अनेकांनी ट्रोल केलं. पण ट्रोल करणाऱ्यांना कबीर बेदी यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं.
कबीर बेदी यांना कायम त्यांच्या चार लग्नांबद्दल विचारण्यात आलं. चार लग्नांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर कबीर यांनी ‘कोणतंही लग्न वन नाइट स्टँड नव्हतं, प्रत्येक पत्नीसोबत माझं नातं अधिक काळ होतं.. असं वक्यव्य कबीर बेदी यांनी केलं. आता कबीर बेदी त्यांच्या खासगी आयुष्यात प्रचंड आनंदी आहेत.
दरम्यान, कबीर बेदी आणि त्यांची पहिली पत्नी प्रोतिमा बेदी यांना एक मुलगी आणि मुलगा आहे. त्यांच्या मुलीचं नाव पूजा बेदी, तर मुलाचं नाव सिद्धार्थ असं होतं. एकदा पूजा बेदी हिने सावत्र आई परवीन हिच्याबद्दल वक्तव्य केलं ज्यामुळे अभिनेत्याचं चौथं लग्न तुफान चर्चेत आलं. वडिलांच्या चौथ्या लग्नानंतर पूजा म्हणाली होती की, ‘प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी सावत्र आई असतेच… आता माझ्यापण आली आहे…
