AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सदगुरुंच्या ब्रेन सर्जरीविषयी कळताच कंगनाला बसला मोठा धक्का; म्हणाली ‘मला कोणत्याच गोष्टीवर..’

सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या मेंदूवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीविषयी अनेकांनी काळजी व्यक्त केली. अभिनेत्री कंगना रनौतने सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. पूर्णपणे खचल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

सदगुरुंच्या ब्रेन सर्जरीविषयी कळताच कंगनाला बसला मोठा धक्का; म्हणाली 'मला कोणत्याच गोष्टीवर..'
Kangana Ranaut and SadhguruImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 21, 2024 | 9:16 AM
Share

मुंबई : 21 मार्च 2024 | आध्यात्मिक नेते सदगुरू जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्लीतल्या एका खाजगी रुग्णालयात तातडीने मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयाकडून बुधवारी यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं होतं. गेल्या चार आठवड्यांपासून त्यांना डोकेदुखीचा त्रास होत होता. 17 मार्च रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असून सदगुरुंना शस्त्रक्रियेनंतर कृत्रिम श्वसन यंत्रणा मुक्त करण्यात आलंय, असं इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. सदगुरुंच्या सर्जरीविषयी कळताच सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. अभिनेत्री कंगना रनौतनेही एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहित सदगुरुंच्या प्रकृतीविषयी कळताच खचून गेल्याची भावना व्यक्त केली.

कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘आज जेव्हा मी सदगुरुंना आयसीयूच्या बेडवर पाहिलं तेव्हा मला त्यांच्या अस्तित्वाच्या नश्वर स्वभावाची अचानक जाणीव झाली. ते आपल्यासारखंच हाडं, रक्त, मांसाचे बनले आहेत, हे याआधी कधीच माझ्या मनात आलं नव्हतं. जणू काही देवच कोसळला, ही पृथ्वी हलली आणि आकाशाने मला एकटं सोडलं असं वाटलं होतं. माझं डोकं गरगरू लागत होतं. वास्तव परिस्थितीची जाणीव मला होत नव्हती आणि मला त्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवायचा नव्हता. मी अचानक रडू लागले.’

‘आज लाखो लोक (भक्त) माझ्यासारखेच दु:खी असतील. मला माझं दु:ख तुम्हा सर्वांसोबत शेअर करायचं आहे, मी ते एकटं सहन करू शकत नाही. ते लवकरच बरे व्हावेत. अन्यथा सूर्य उगवणार नाही आणि पृथ्वीही हलणार नाही. हा क्षण निर्जीव आणि स्थिर आहे’, अशा शब्दांत कंगनाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. बुधवारी सदगुरुंच्या टीमकडून त्यांचा रुग्णालयातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये त्यांच्या डोक्यावर पट्टी बांधलेली दिसून येत आहे. गेल्या चार आठवड्यांपासून त्यांना तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवत होता. तरीसुद्धा ते महाराशिवरात्रीच्या मोठ्या कार्यक्रमांसह इतरही विविध आयोजित कार्यक्रमांवर लक्ष केंद्रीत करत होते. अखेर 15 मार्च रोजी त्यांचा एमआरआय (MRI) स्कॅन केला असता त्यांच्या मेंदूतून रक्तस्राव होत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर 17 मार्च रोजी त्यांच्यावर तातडीने सर्जरी करण्यात आली.

सदगुरुंवर उपचार करणारे अपोलो हॉस्पीटलचे न्युरोलॉजिस्ट डॉ. विनित सुरी म्हणाले, “आम्ही त्यांच्याशी गंमत करत होतो की आमच्या हातात जे होतं ते आम्ही केलं, पण तुम्हीच स्वत:ला बरं करत आहात. ज्याप्रकारची सुधारणा आम्ही त्यांच्या आरोग्यात पाहतोय, ती अपेक्षेपलीकडची आहे. ते आता बरे आहेत. त्यांचा मेंदू, शरीर आणि इतर महत्त्वाचे पॅरामीटर्स सामान्य आहेत.”

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.