कंगना रनौतने केली ‘या’ हॉलिवूड अभिनेत्रीशी स्वतःची तुलना, म्हणते…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मिडियावर खूप सक्रिय असते.

कंगना रनौतने केली 'या' हॉलिवूड अभिनेत्रीशी स्वतःची तुलना, म्हणते...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मिडियावर खूप सक्रिय असते. कोरोना काळातही घरी राहून ती चर्चेत होती. कंगना नेहमीच काहीतरी वादग्रस्त ट्विट करत असते. नुकताच कंगनाने स्वत: ची तुलना हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोटसोबत केली आहे. इतकेच नव्हे तर संपूर्ण जगात अन्य कोणतीही अभिनेत्री तिच्यासारखी नसल्याचा दावाही कंगनाने केला आहे. पुढे कंगना म्हणाली की, तिच्या सारखे ग्लॅमर आणि अ‍ॅक्शन फक्त माझ्याकडेच आहे. (Kangana Ranaut compares with Hollywood actress Gal Gadot)

आणि असे जर दुसऱ्या कोणत्या अभिनेत्रीला वाटत असेल की, आमच्या सारखे ग्लॅमर आणि अ‍ॅक्शन त्यांच्याकडे आहे. त्यांना मी आव्हान करते की, त्यांनी पुढे येऊन ते सिध्द करावे. अशाप्रकारचे ट्विट करून कंगनाने इतर अभिनेत्रींना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे बघण्यासारखे ठरणार आहे की, कंगनाच्या या ट्विटला दुसऱ्या अभिनेत्री या उत्तर देतात. कारण या ट्विटमध्ये कंगनाने स्वत: ची तुलना गॅल गॅडोटसोबत केली आहे.

काही दिवसांपूर्वी कंगनाने एका मुलाखतीत जावेद यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवून सांगितलं होतं की, राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय खूप मोठे लोक आहेत. तू जर त्यांच्याविरोधात माफी मागितली नाही तर तुझं नुकसान होईल. ते तुला जेलमध्ये टाकतील.

त्यावेळी तुझ्या हातात काहीच राहणार नाही. त्यावेळी तुला आत्महत्या करावी लागेल, असे त्यांचे शब्द होते. त्यांना असं का वाटतं की, मी जर ऋतिक रोशनची माफी नाही मागितली तर मला आत्महत्या करावी लागेल. ते माझ्यावर इतक्या जोरात ओरडले होते की माझे पाय कापयला लागले होते”, अशी कंगना त्या मुलाखतीत म्हणाली होती.

कंगनाने अनेकवेळा जावेद यांच्यावर अशाप्रकारची टीका केली आहे. कंगनाची बहीण रंगोलीने देखील जावेद यांच्यावर सोशल मीडियाद्वारे अशाप्रकारचे आरोप केले आहेत. अखेर याविरोधात जावेद अख्तर यांनी कायदेशीर पाऊल उचललं आहे.

संबंधित बातम्या : 

नसीरुद्दीन शहांचं असं काही ट्वीट की नेटकरी भडकले, पण पत्नी रत्ना पाठकनं केला धक्कादायक खुलासा !

गावकरी म्हणाले, आमच्या गावात माकडांचा उच्छाद वाढलाय, सोनू म्हणाला, आता तेवढंच करायचं राहिलं!

Video | लेकीनं ट्विंकल खन्नासाठी गिटार वाजवून गायलं गाणं, पाहा व्हिडीओ !

(Kangana Ranaut compares with Hollywood actress Gal Gadot)

Published On - 4:16 pm, Tue, 9 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI