तलवारीनंतर कंगनाच्या हातात बंदूक ‘धाकड’ चा फोटो शेअर आणि म्हणाली- मृत्यूची देवी…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) धाकड (Dhaakad) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

तलवारीनंतर कंगनाच्या हातात बंदूक 'धाकड' चा फोटो शेअर आणि म्हणाली- मृत्यूची देवी...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) धाकड (Dhaakad) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच कंगनाने चित्रपटातील तिचा एक लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत कंगना हातात बंदूक घेऊन अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. मात्र, सोशल मीडियावर कंगनाला या फोटोंवर बरीच टीका होताना दिसत आहे. या चित्रपटात कंगना एजंट अग्निच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने तिचे दोन्ही फोटो शेअर करताना तिची तुलना देवी भैरवीसोबत केली आणि याचमुळे कंगनावर आता टिका केली जात आहे. (Kangana Ranaut shared a photo of Dhaakad movie)

काही दिवसांपूर्वी कंगनाचा धाकड चित्रपटाचा फस्ट लूक समोर आला होता. त्या पोस्टरमध्ये कंगनाच्या हातात तलवार आणि जवळच मृतदेह पडलेले दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करताना कंगनाने लिहिले होते की, ‘ निर्भय आणि क्रूर आहे. भारताचा पहिला महिला लीड अ‍ॅक्शन चित्रपट 1 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित होईल.’ कंगना भोपाळमध्ये तिच्या आगामी धाकड (Dhaakad) चित्रपटाचे शूटिंग करत होती. त्यावेळी शूटिंग दरम्यान कंगनाला एका आंदोलनाचा सामना करावा लागला होता.

भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या. त्याची मागणी होती की, कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे. मात्र, कंगना या आंदोलनाला न घाबरता शूटिंग पूर्ण केलं होत.

कंगनाने काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली होती. यापूर्वी कंगनाने पंगा आणि मणिकर्णिका चित्रपटाचे शूट मध्यप्रदेशमध्ये केले आहे. आता ती तिसऱ्यांदा भोपाळमध्ये शूटिंग करत आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या भेटीनंतर कंगनाने सांगितले आहे की, मध्यप्रदेशमध्ये धाकड चित्रपट करमुक्त होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या : 

आजारातून उठताच रेमो डिसूझाचा काळ्या रंगावरून धक्कादायक खुलासा, म्हणाला….!

Video | ‘व्हॅलेंटाईन वीक’ मध्ये आलियाचा कहो ना प्यार है पॅटर्न, भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल!

करण जोहरच्या मुलांच्या बर्थ डे पार्टीत तैमुरची हजेरी, अनेक स्टारकिडची हजेरी, पाहा फोटो…

(Kangana Ranaut shared a photo of Dhaakad movie)

Published On - 12:54 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI