भारताची आबादी वाढतेय, तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात पाठवा, कंगना रनौतचा हल्लाबोल!

Harshada Bhirvandekar

|

Updated on: Apr 21, 2021 | 11:04 AM

बॉलिवूडची ‘कंट्रोव्हर्सी क्वीन’ कंगना रनौत (Kangana Ranaut) प्रत्येक विषयावर तिची प्रतिक्रिया देत असते. बर्‍याच वेळा ती असे काही बोलते, ज्यानंतर तिला खूप ट्रोलही केले जाते. आता पुन्हा एकदा कंगना तिच्या एका ट्विटने चर्चेत आली आहे.

भारताची आबादी वाढतेय, तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात पाठवा, कंगना रनौतचा हल्लाबोल!
कंगना रनौत

मुंबई : बॉलिवूडची ‘कंट्रोव्हर्सी क्वीन’ कंगना रनौत (Kangana Ranaut) प्रत्येक विषयावर तिची प्रतिक्रिया देत असते. बर्‍याच वेळा ती असे काही बोलते, ज्यानंतर तिला खूप ट्रोलही केले जाते. आता पुन्हा एकदा कंगना तिच्या एका ट्विटने चर्चेत आली आहे. भारतातील वाढती लोकसंख्या या विषयावर तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे (Kangana Ranaut tweet on growing population in india goes viral).

वाढत्या लोकसंख्येमुळे देशात लोक मरत आहेत, असे कंगना म्हणाली. अभिनेत्रीने ट्विट केले की, ‘देशात लोकसंख्या सतत वाढत असल्याने लोक मरत आहेत. म्हणून तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्यांना दंड ठोठावावा आणि त्यांना तुरूंगवासाची शिक्षा द्यावी.’

कंगनाने लिहिले की, ‘हे खरे आहे की इंदिरा गांधी निवडणूक हरली आणि नंतर त्यांनाही मारण्यात आले, कारण त्यांना या विषयावर कारवाई करायची होती.’

पाहा कंगनाचे ट्विट

कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर बरेच चर्चेत आले आहेत. अभिनेत्रीच्या या ट्विटवर लोकांच्या मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक म्हणण्याला पाठिंबा देत आहेत तर काही त्यांना ट्रोल करत आहेत (Kangana Ranaut tweet on growing population in india goes viral).

रमजानच्या संदर्भात पंतप्रधान मोदींना केले आवाहन

कुंभमेळ्यात अनेक साधू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले, ज्यानंतर हा मेळा प्रतीकात्मक स्वरुपात करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत माहिती दिली होती. पीएम मोदींच्या ट्वीटवर कंगना यांनी आपली प्रतिक्रिया दिली आणि रमजानविषयीही आपले मत सांगितले आहे.

कुंभमेळा प्रतीकात्मक केल्यानंतर कंगनाने लिहिले आहे की, ‘आदरणीय पंतप्रधानजी जे लोक रमजान निमित्त एकत्र जमतात त्यांनाही थांबवावे.’

‘थलायवी’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

कंगनाच्या व्यावसायिक आयुष्याविषयी बोलताना ती लवकरच ‘थलायवी’ चित्रपटात दिसणार आहे. ‘थलायवी’ हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री सी. जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. कंगनाचा हा चित्रपट 23 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, पण त्यानंतर कोविडमुळे चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले.

यानंतर, आता असे वृत्त आले आहे की, त्याच दिवशी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होईल. निर्माते आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करणार आहेत. मात्र, हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार नाही, असे अभिनेत्रीने स्पष्ट केले आहे. कंगना म्हणाली, चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी ‘थलायवी’ ओटीटीवर येणार नाही. चित्रपटाविषयी अफवा पसरवण्याच्या चित्रपट माफियांच्या योजनेकडे दुर्लक्ष करा. ‘थलायवी’ केवळ थिएटरमध्येच प्रदर्शित होणार आहे.

(Kangana Ranaut tweet on growing population in india goes viral)

हेही वाचा :

Kartik Aaryan | ‘दोस्ताना 2’मधून कार्तिक आर्यन का झाला आऊट? जाणून घ्या यामागचे कारण…

खऱ्या आयुष्यातला प्रसंग जेव्हा पडद्यावर साकारला जातो, अभिनेता किरण मानेंच्या जबराट संघर्षाचा भन्नाट प्रवास!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI