कंगना रनौतच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता, न्यायालयाने पाठवली नोटीस!

प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.

कंगना रनौतच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता, न्यायालयाने पाठवली नोटीस!

मुंबई : प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. कंगनाने विविध मुलाखतीत त्यांची बदनामी केली, असा दावा जावेद अख्तर यांनी केला होता. आता या प्रकरणात कंगना रनौतच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने कंगनाला नोटीस बजावली आहे. (Kangana Ranaut’s troubles are likely to escalate, the court issued a notice)

काही दिवसांपूर्वी कंगनाने एका मुलाखतीत जावेद यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवून सांगितलं होतं की, राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय खूप मोठे लोक आहेत. तू जर त्यांच्याविरोधात माफी मागितली नाही तर तुझं नुकसान होईल. ते तुला जेलमध्ये टाकतील. त्यावेळी तुझ्या हातात काहीच राहणार नाही. त्यावेळी तुला आत्महत्या करावी लागेल, असे त्यांचे शब्द होते. त्यांना असं का वाटतं की, मी जर ऋतिक रोशनची माफी नाही मागितली तर मला आत्महत्या करावी लागेल.

ते माझ्यावर इतक्या जोरात ओरडले होते की माझे पाय कापायला लागले होते”, असे कंगना त्या मुलाखतीत म्हणाली होती. कंगनाने अनेकवेळा जावेद यांच्यावर अशाप्रकारची टीका केली आहे. कंगनाची बहीण रंगोलीने देखील जावेद यांच्यावर सोशल मीडियाद्वारे अशाप्रकारचे आरोप केले होते. कंगना रनौतच्याविरोधात जावेद अख्तरने अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.

कंगनाला 22 जानेवारीला पोलिसांसमोर हजर व्हावे लागले होते. त्या सर्व प्रकरणावर कंगना रनौतने प्रतिक्रिया दिली होती. कंगनाने ट्विटमध्ये म्हटले होते की, आज परत एक समन्स आला आहे. तुम्ही मला तुरूंगात टाका आणि माझा छळ करा तरीही मी संघर्ष करेल, पाहिजे तर माझ्यावर 500 गुन्हे दाखल करा

संबंधित बातम्या : 

हंसल मेहता म्हणाले, सिमरन चित्रपट करणं ही माझी चूक; कंगना म्हणते “अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का”

Vamika | विराट-अनुष्काच्या लेकीचं ‘वमिका’ नामकरण, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक!

Thank God | सिद्धार्थचा ‘थँक्स गॉड’चित्रपटातील पहिला लूक बघितला का?

(Kangana Ranaut’s troubles are likely to escalate, the court issued a notice)

Published On - 12:55 pm, Mon, 1 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI