AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अलिशान बंगले, महागड्या गाड्या, भारतातील सर्वात श्रीमंत दिग्दर्शक आणि निर्माता, करण जौहरची संपत्ती पाहून बसेल धक्का

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जौहर आहे महागड्या गाड्यांचा शौकिन. अनेक ठिकाणी आहेत कोट्यांवधीचे बंगले. एकूण संपत्ती पाहून बसेल धक्का.

अलिशान बंगले, महागड्या गाड्या, भारतातील सर्वात श्रीमंत दिग्दर्शक आणि निर्माता, करण जौहरची संपत्ती पाहून बसेल धक्का
Image Credit source: Social media
| Updated on: May 24, 2026 | 11:39 AM
Share

Karan Johar Net Worth: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जौहर आज भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत फिल्ममेकर म्हणून ओळखला जातो. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या वारशाला त्याने केवळ जपले नाही तर त्याचे मोठ्या व्यावसायिक साम्राज्यात रूपांतर केले. आलिशान बंगल्यांपासून लक्झरी गाड्यांपर्यंत आणि कोट्यवधींच्या व्यवसायापर्यंत करण जौहरची लाइफस्टाइल सध्या चर्चेत आहे.

करण जौहरचे वडील दिवंगत यश जौहर यांनी स्थापन केलेल्या Dharma Productions या प्रोडक्शन हाऊसला करणने नव्या उंचीवर नेले. आज धर्मा प्रोडक्शन्स हे भारतातील सर्वात यशस्वी आणि प्रभावशाली फिल्म बॅनरपैकी एक मानले जाते. करणने केवळ चित्रपट निर्मितीच नाही तर डिजिटल कंटेंट, टीव्ही आणि गुंतवणुकीच्या माध्यमातूनही मोठे व्यावसायिक जाळे उभे केले आहे.

करण जौहरने 1998 मध्ये आलेल्या कुछ कुछ होता है या सुपरहिट चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट दिले. त्याच्या चित्रपटांमधील भव्यता, कौटुंबिक भावना आणि स्टाइलिश मांडणी यामुळे त्याला बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख मिळाली.

1740 कोटींचा मालक

‘द फायनान्शियल एक्सप्रेस’च्या रिपोर्टनुसार, करण जौहरची एकूण संपत्ती तब्बल 1740 कोटी रुपये इतकी आहे. हा आकडा इतका मोठा आहे की भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज दिग्दर्शक त्यांच्या आसपासही पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे करण जौहर हा सध्या भारतातील सर्वात श्रीमंत दिग्दर्शक आणि निर्मात्यांपैकी अग्रस्थानी आहेत.

करणच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे धर्मा प्रोडक्शन्स. याशिवाय तो विविध मीडिया कंपन्या आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो. त्याचा लोकप्रिय चॅट शो Koffee with Karan देखील त्याच्या कमाईचे महत्त्वाचे साधन आहे. अनेक रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक आणि होस्ट म्हणूनही तो झळकतो.

महागड्या गाड्यांचा मालक

करण जौहरच्या आलिशान लाइफस्टाइलबद्दल बोलायचे झाले तर मुंबईतील सर्वात महागड्या भागांमध्ये त्याचे कोट्यवधींचे बंगले आहेत. तसेच दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित मालाबार हिल परिसरातही त्याचे लक्झरी घर असल्याचे सांगितले जाते.

महागड्या गाड्यांचाही करणला प्रचंड शौक आहे. त्याच्या गॅरेजमध्ये Rolls-Royce, BMW, Audi आणि Mercedes-Benz यांसारख्या लक्झरी ब्रँडच्या अनेक गाड्या आहेत. त्याच्या काही गाड्या खास कस्टमाइज्ड असल्याचेही म्हटले जाते.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल