तर करण जोहरला देश सोडून जावं लागेल… असं काय आहे चॅटमध्ये?
करणने त्याच्या बॉलिवूड व्हॉट्सअॅप ग्रुपबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

करण जोहर हा बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे. करणने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत, त्याचबरोबर तो तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठीही ओळखला जातो. करण जोहरचे बॉलिवूडमधील सर्वांसोबत चांगले संबंध आहेत. अनेक कलाकारांनी करणच्या गॉसिपिंगच्या सवयीबद्दल भाष्य केलेलं आहे. अशातच आता करणने त्याच्या बॉलिवूड व्हॉट्सअॅप ग्रुपबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
करण जोहरचे व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही पातळीवर चित्रपट कलाकारांसोबत चांगले संबंध आहेत. करण अनेकदा इतर स्टार्सबद्दलही चर्चा करत असतो. काही काळापूर्वी करणला त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटवर पुस्तक लिहिण्याबद्दल किंवा चित्रपट बनवण्याबद्दल विचारले गेले होते, तेव्हा त्याने सांगितले की जर असे झाले तर त्याला देश सोडावा लागेल. त्याचबरोबर करणने केवळ स्वतःसाठीच नाही तर चित्रपट क्षेत्रातील त्याच्या मित्रांसाठीही हेच विधान केले आहे.
लंडनला जावे लागेल
करण जोहरने अलीकडेच बरखा दत्त यांना एका शोमध्ये मुलाखत दिली. यावेळी एका प्रेक्षकाने त्याला बॉलिवूडमधील लोकांसोबतच्या व्हॉट्सअॅप ग्रुपबाबत प्रश्न विचारला. करणला हेही विचारले की तू कधी त्या बॉलिवूड व्हॉट्सअॅप ग्रुपच्या चॅटवर चित्रपट बनवण्याचा किंवा पुस्तक लिहिण्याचा विचार केला आहे का? याला उत्तर देताना करणने म्हटले की, जर कोणाला माझे ग्रुप चॅट मिळाले तर मला आणि माझ्या मित्रांना देशाबाहेर लंडनला जावे लागेल.
करणने सांगितले कारण
पुढे बोलताना करण म्हणाला की, मी आणि माझे मित्र आपल्या सभोवतालच्या वातावरणाचे आणि काय चालले आहे याचे अतिशय स्पष्ट, प्रामाणिक आणि कधीकधी अगदी स्पष्ट विश्लेषण करतात. यात आम्ही फॅशन क्रिटीक बनतो, कधी चित्रपट समीक्षक बनतो, आम्ही त्या ग्रुपमधील प्रत्येक गोष्टीचे समीक्षक आहोत. प्रत्येकाचे स्वतःचे मत असते, कधी ते विचित्रही असू शकते. त्यामुळे आपल्यापैकी कोणीही कधीही ती मते मांडू शकत नाही. त्यामुळे जर ती चॅट बाहेर आली तर मला देश सोडावा लागू शकतो.
