सोनम कपूरच्या पार्टीतून अचानक करीना कपूर बाहेर पडली; कारमध्ये बसताना होतं डोळ्यात पाणी; व्हिडीओ पाहून चाहते हैराण
सोनम कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर करिना कपूरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पार्टीनंतर ती सोनम कपूरच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, अभिनेत्रीचे चाहते थक्क झाले. कारण करीना कारमध्ये बसताना चक्क रडताना दिसत आहे.

बॉलीवूडमधील पार्ट्यांबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता असते. अनेक स्टार वेगवेगळ्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसतात. चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री त्यांच्या सौंदर्याने या पार्ट्यांमध्ये आकर्षण वाढवतात. या पार्ट्यांमुळे त्यांचे लूक आणि आउटफिट हेडलाइन्समध्ये येतात. अलिकडेच बी-टाऊनमध्ये एका भव्य वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ही वाढदिवसाची पार्टी सोनम कपूरची होती. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चित्रपटातील कलाकारांची गर्दी झाली होती. कुटुंबातील सदस्यांपासून ते अनेक जवळच्या मित्रांपर्यंत या पार्टीला उपस्थित होते. करीना कपूर आणि करिश्मा कपूरही पार्टीला पोहोचल्या होत्या. आता या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्यापैकी एक करीना कपूरचा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अभिनेत्रीचे चाहते खूप नाराज होत आहेत. अनेक चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
करीनाचा व्हिडिओ व्हायरल झाला
खरंतर, करीना कपूर तिचा पती सैफ अली खानसोबत सोनम कपूरच्या वाढदिवसाला पिवळ्या रंगाच्या सॅटिन फ्लोई ड्रेसमध्ये पोहोचली होती. केसांची सुंदर हेअरस्टाईल आणि डोळ्यात काजळ असा कमी पण सुंदर मेकअपमध्ये ती दिसली. मात्र ती अचानक पार्टीमधून बाहेर पडली तेव्हा सर्व कॅमेरे तिच्यावर केंद्रित होते. पापाराझींनी तिचा एक क्लोजअप व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गाडीत बसलेली दिसत आहे. या व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओमध्ये तिचा उदास चेहरा दिसत आहे, शिवाय तिच्या डोळयात पाणी दिसत आहे. हे पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. अनेक चाहत्यांना अभिनेत्री अस्वस्थ वाटली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अभिनेत्रीचा चाहत्यांना धक्का बसला
व्हिडीओमध्ये करीनाच्या चेहऱ्यावर अनेक बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसत आहेत, ज्या मेकअप केल्यानंतरही स्पष्टपणे दिसतात हे सुद्धा चाहत्यांच्या लक्षात आलं आहे. अनेकांनी हे देखील पाहिलं की अभिनेत्री दुःखी आहे आणि ती तिचे अश्रू पुसत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, ‘करिनाने स्वतःची काय अवस्था केली आहे, ती आधीच म्हातारी दिसू लागली आहे.’ दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, ‘मी यापूर्वी कधीही करिनाला अशा अवस्थेत पाहिले नव्हतं, जिथे अभिनेत्री स्वतःची देखभाल करत आहे, ती तिच्या चेहऱ्याची काळजी का घेत नाही.’ दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, ‘हा सर्व पार्टीचा परिणाम आहे, असे दिसते की ती खूप थकली आहे आणि तिला आराम करायचा आहे.’ दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की, ‘करीना रडत आहे का, ती तिचे अश्रू पुसत आहे.’
View this post on Instagram
लोकांनी करीना कपूरला पाठिंबा दिला
अनेक चाहत्यांनीही अभिनेत्रीला पाठिंबा दिला आणि म्हटले की ती ४४ वर्षांची असूनही एक नैसर्गिक सौंदर्यवती आहे. एका व्यक्तीने लिहिले, ‘करीना तिच्या सुरकुत्या किती सुंदरपणे हाताळत आहे. तिला त्या लपवण्याची घाई नाही.’ दुसऱ्या व्यक्तीने लिहिले, ‘ती खूप गोंडस दिसतेय. मग गाडीत… खूप थकलेली का दिसतेय? दिवसरात्र धावणे सोपे नाही, तिला सलाम. रॉकस्टारसारखे तुमचे जीवन संतुलित ठेवणे कठीण आहे.’ तर, दुसऱ्या व्यक्तीने सहमती दर्शवली आणि लिहिले, ‘सहमत आहे… ती नैसर्गिक सौंदर्यवती दिसते… प्लास्टिक नाही..’
करीना कपूर शेवटची ‘बकिंगहॅम मर्डर्स’ आणि ‘सिंघम अगेन’ मध्ये दिसली होती. याशिवाय, तिच्या आगामी चित्रपटाबाबत कोणतेही विशेष अपडेट समोर आलेले नाहीत.