Kareena Kapoor | प्रियांकासोबतच्या ‘कॅट फाइट’बद्दल अखेर करीनाने सोडलं मौन, म्हणाली..

दोन अभिनेत्रींमधील 'कॅट फाइट' ही बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी काही नवीन गोष्ट नाही. आजवर बऱ्याच अभिनेत्रींमध्ये हे शीतयुद्ध पहायला मिळालं. अभिनेत्री करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा यांच्यातही अशी कॅट फाइट असल्याची जोरदार चर्चा होती. त्यावर आता करीनाने मौन सोडलं आहे.

Kareena Kapoor | प्रियांकासोबतच्या 'कॅट फाइट'बद्दल अखेर करीनाने सोडलं मौन, म्हणाली..
Kareena Kapoor and Priyanka ChopraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 7:09 PM

मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनी एकाच वेळी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ऐतराज’ या चित्रपटात दोघींनी एकत्र काम केलं होतं. सोशल मीडियावर या दोघी अभिनेत्री वेळोवेळी एकमेकींविषयी सकारात्मक बोलताना दिसतात. मात्र एक वेळ अशी होती, जेव्हा करीन आणि प्रियांकामधील शीतयुद्धाची जोरदार चर्चा होती. या दोघींमध्ये अजिबात पटत नसल्याचं वृत्त त्यावेळी चर्चेत होतं.

कॅट फाइटबद्दल काय म्हणाली करीना?

निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये जेव्हा दोघींनी एकत्र हजेरी लावली, तेव्हा या चर्चा केवळ अफवा असल्याचं त्यांनी सिद्ध केलं होतं. करण जोहरच्या या शोमध्ये प्रियांका आणि करीना एकमेकींसोबत अत्यंत प्रेमाने वागताना दिसल्या होत्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीनाला प्रियांकासोबतच्या कॅट फाइटविषयी प्रश्न विचारण्यात आला. 90 च्या दशकात आणि 2000 सालच्या सुरुवातीला करीना आणि प्रियांकाच्या कॅट फाइटची जोरदार चर्चा होती.

अनेक वर्षांनंतर सोडलं मौन

या चर्चांबद्दल प्रतिक्रिया देताना करीना म्हणाली, “अरे देवा! 90 च्या दशकात या चर्चांना उधाण आलं होतं. 90 च्या दशकात आणि त्यानंतर 2000 मध्येही प्रत्येकाचं कोणासोबत तरी कॅट फाइट असायचं. तुम्ही काही बोललात तरी त्याला कॅट फाइट म्हणून प्रसिद्ध केलं जायचं.” पण या चर्चांमध्ये काही तथ्य होतं का असा प्रश्न विचारला असता करीना पुढे म्हणाली, “नाही नाही. ती फक्त वायफळ बडबड होती. त्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नव्हतं. नेमकं काय घडत होतं हेच मला त्यावेळी कळत नव्हतं. पण माझ्या मते त्यावेळी सर्वांमध्येच एक वेगळा उत्साह आणि जिद्द होती. प्रत्येकालाच इंडस्ट्रीमध्ये स्वतःला सिद्ध करायचं होतं.”

हे सुद्धा वाचा

करीनाने नुकतंच ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. तिचा ‘जाने जान’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यामध्ये तिने जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांच्यासोबत स्क्रीन शेअर केला होता. करीना लवकरच ‘द क्रू’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्यासोबत कृती सनॉन आणि तब्बू यांच्याही भूमिका आहेत.

Non Stop LIVE Update
रवी राणांमुळे नवनीत राणा पराभूत होणार, बच्चू कडू यांचा मोठा दावा काय?
रवी राणांमुळे नवनीत राणा पराभूत होणार, बच्चू कडू यांचा मोठा दावा काय?.
राज ठाकरे फुसका... ठाकरे गटातील नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरे फुसका... ठाकरे गटातील नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका.
निषेध... No वोट, मुंबईच्या 'या' भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार
निषेध... No वोट, मुंबईच्या 'या' भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार.
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?.
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्...
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्....
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार.
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले.
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर.