AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor | ‘तैमुर’ नावावरून झालेल्या ट्रोलिंगवर अखेर करीनाने सोडलं मौन; म्हणाली “तो धक्का पचवणं..”

सैफ अली खान आणि करीना कपूरने जेव्हा त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव तैमुर असं ठेवलं, तेव्हा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झाली. या ट्रोलिंगवर करीनाने अखेर मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

Kareena Kapoor | 'तैमुर' नावावरून झालेल्या ट्रोलिंगवर अखेर करीनाने सोडलं मौन; म्हणाली तो धक्का पचवणं..
सैफ अली खान, करीना कपूर, तैमुर अली खानImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 12, 2023 | 8:34 AM
Share

मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री करीना कपूर 2016 मध्ये पहिल्यांदा आई झाली. सैफ अली खान आणि करीनाने त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव तैमुर असं ठेवलं. मात्र या नावावरून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग सुरू झाली. तैमुर आता सहा वर्षांचा झाला आहे. मात्र जन्मापासूनच त्याला आणि त्याच्या आईवडिलांना तैमुर या नावावरून टीकेचा सामना करावा लागला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीनाने तेव्हाचा कटू अनुभव सांगितला. कोणत्याच आई किंवा मुलाला अशा अनुभवाचा सामना करावा लागू नये, असं करीनाने म्हटलं.

“कोणालाच अशा अनुभवाचा सामना करावा लागू नये”

‘एक्स्प्रेस अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली, “मला वाटतं की कोणत्याही आई किंवा मुलाला अशा अनुभवाचा सामना करावा लागू नये. मला आजही त्या ट्रोलिंगमागचं कारण कळत नाही. कारण कोणालाच इतरांचा अपमान करायचा नसतो किंवा दुखवायचं नसतं. आपल्याला भाषणस्वातंत्र्य आहे, आपल्या मनासारखं वागण्याचं स्वातंत्र्य आहे. किमान मला आणि सैफला तरी असंच वाटतं.” यावेळी करीनाने तैमुर या नावाचा अर्थ ‘लोह पुरुष’ असा सांगितला. त्याचप्रमाणे हे नाव कसं सुचलं त्याविषयीचा किस्सा तिने पुढे सांगितला.

तैमुर हे नाव कसं सुचलं?

“सैफ त्याच्या शेजारच्या मित्रासोबत लहानाचा मोठा झाला आणि त्याला त्या मित्राचं नाव खूप आवडायचं. त्याचं नाव तैमुर असं होतं. त्यामुळे सैफने म्हटलं होतं की जर मला मुलगा झाला, तर तो माझा पहिला मित्र असेल. मला त्याचं नाव तैमुर असं ठेवायला आवडले. अशा पद्धतीने तैमुर हे नाव सुचलं, कारण सैफच्या पहिल्या मित्राचं नाव तैमुर होतं”, असं करीना म्हणाली. जेव्हा सैफ आणि करीनाने त्या नावाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा अर्थ ‘लोह’ असल्याचं समजलं. मला माझा मुलगा लोहासारखा शक्तीशाली हवा, म्हणून ते नाव खूप आवडलं.

ट्रोलिंगवर करीनाची प्रतिक्रिया

तैमुर हे नाव इतिहासातील कोणत्याच व्यक्तिमत्त्वावरून घेण्यात आलं नाही असंही तिने यावेळी स्पष्ट केलं. “त्या नावाचा इतिहासातील कोणत्याही व्यक्तीशी काहीच संबंध नाही. जेव्हा लोकांनी त्या नावावरून ट्रोल करण्यास सुरुवात केली, तेव्हा मला धक्काच बसला. पण सैफ आणि मी त्यावर व्यक्त न होण्याचं ठरवलं होतं. त्या संपूर्ण काळात आम्ही शांत राहिलो म्हणूनच तो वाद हळूहळू शमला. आम्ही आमच्या मुलाचं नाव अत्यंत सुंदर ठेवलंय आणि आम्हाला ते नाव आवडतं, म्हणून आम्ही ते सर्व प्रकरण शांतपणे हाताळलं होतं”, असंही करीना पुढे म्हणाली.

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.