AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor Khan : माझ्या नवऱ्याला मी सेक्सी वाटते, मला बोटॉक्सची गरज नाही , बेबोने बिनधास्त सांगितलं

बॉलिवूडच्या नामवंत अभिनेत्री पैकी एक असलेल्या करीना कपूरने अभिनयाचं नाणं वेळोवेळी खणखणीत वाजवलं आहे. अनेकविध भमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलंय. एकीकडे ग्लॅमरस भूमिका साकारतानाच तिने नॉन-ग्लॅमरस रोलही सहजतेने केलेत.

Kareena Kapoor Khan : माझ्या नवऱ्याला मी सेक्सी वाटते, मला बोटॉक्सची गरज नाही , बेबोने बिनधास्त सांगितलं
Image Credit source: instagram
| Updated on: Sep 12, 2024 | 2:12 PM
Share

बॉलिवूडच्या नामवंत अभिनेत्री पैकी एक असलेल्या करीना कपूरने अभिनयाचं नाणं वेळोवेळी खणखणीत वाजवलं आहे. अनेकविध भमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलंय. एकीकडे ग्लॅमरस भूमिका साकारतानाच तिने नॉन-ग्लॅमरस रोलही सहजतेने केलेत. अभिनयाप्रमाणेच करीना ही तिच्या बिनधास्त वागण्यामुळे, वक्तव्यांमुळेही ओळखली जाते. सध्या करीना तिच्या ‘द बकिंघम मार्केट्स’ या आगामी चित्रपटाच्या रिलीजमुळे व्यस्त असून त्याची ती निर्मातीदेखील आहे. यामध्ये तिने गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडलाय. नेहमी स्पष्ट बोलणारी करीना ही चाहत्यांनाही खूपच आवडते.

करीना आता 44 वर्षांची झाली असली तरी तू अजूनही खूप फिट आहे. मूळची पंजाबी असल्याने तिच्या चेहऱ्यावर नेहमी तेज दिसतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान ती बोटॉक्स, फिलर सर्जरी बद्दल बोलली. मला या सगळ्याची ( बोटॉक्सची) गरज नाही, असं तिने स्पष्टचं सांगितलं. करीना नक्की काय म्हणाली , चला वाचूया.

काय म्हणाली करीना ?

मी सुरूवातीपासूनच टॅलेंटवर काम मिळवलं, मेहनतही खूप केली. मी नेहमी स्वत:ची नीट काळजी घेतली, फिट राहिले. वय हा सौंदर्याचा भागच आहे. तुम्ही कायम तरूण दिसण्यासाठी प्रयत्न करु नयेत. त्यापेक्षा आहे ते वय एन्जॉय करा. मी ४४ वर्षांची आहे आणि मला याआधी इतकं छान कधीच वाटलं नसेल. मला बोटॉक्स किंवा कोणत्याही स्कॉटिश रिफॉर्मेशनची गरज वाटत नाही. माझ्या पतीला मी सेक्सी वाटते आणि माझे मित्र म्हणतात की मी कमाल दिसते. माझे चित्रपटही चांगले चालतात. मी जशी आहे तसं लोकांनी मला पहावं, आणि माझं कौतुक करावं, असं मला वाटतं.

सेल्फ केअर म्हणजे काय, तर  स्वत:साठी वेळ काढणं , मित्रांसोबत चांगाल वेळ घालवणं, सैफसोबत निवांत वेळ घालवणं, स्वयंपाक करणं, जे आवडेलं ते करणं’, असं करीनाने सांगितलं. ‘ तुम्हाला काय करुन छान वाटेल हे महत्वाचं आहे. चांगलं अन्न, एखाद्यासोबत मनसोक्त गप्पा आणि वाईनची एक बॉटल हे माझ्यासाठी पुरेसं असतं’, असंही ती म्हणाली.

करीनाच्या या वक्तव्याचं सध्या खूप कौतुक होतंय. आपलं वाढतं वय, आहे तसं स्वीकारा हा मोलाचा सल्ला तिने सर्वांना दिला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.