Karisma Kapoor : बापाच्या निधनानंतर मिळाले कोट्यवधी, तरीही करिश्मा लेकीच्या शाळेची फी नाही भरु शकत?
Karisma Kapoor Daughter Samaira Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती संजय कपूर याच्या निधनाला जवळपास 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण अद्यापही त्याच्या संपत्तीमुळे सुरु असलेला दोन्ही पत्नींमधील वाद शमलेला नाही... कोर्टात अद्यापही याप्रकरणी सुनावणी सुरु आहे.

Karisma Kapoor Daughter Samaira Kapoor : 90 च्या दशकातील अव्वल अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती आणि उद्योजक संजय कपूर याच्या निधनाला जवळपास 5 महिने पूर्ण झाले आहे. पण संजय याच्या संपत्तीवरुन दोन पत्नींमध्ये वाद सुरु आहेत आणि हे वाद आता कोर्टात देखील पोहोचले आहेत. हे प्रकरण आता दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचलं आहे, जिथे करिश्माच्या दोन्ही मुलांनी संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेवा कपूरवर बनावट मृत्युपत्र दाखवून संपूर्ण मालमत्ता ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे.
संपत्तीचा वाद सुरु असताना, करिश्मा – संजय यांची लेक समायरा कपूर हिच्या शाळेची दोन महिन्यांची फी अद्याप भरली नसल्याचा दावा कोर्टात करण्यात आला. सांगायचं झालं तर, समायरा सध्या अमेरिकेतील एका युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे. संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी दोन्ही पक्षांना समजावून सांगितलं की, या प्रकरणात मेलोड्रामा निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न करू नका…
30 हजार कोटींच्या संपत्तीवर अद्यापही वाद सुरु
संजय कपूर यांच्या या मृत्युपत्रात सुमारे 30 हजार कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी मुलांच्या वतीने बाजू मांडली आणि सांगितलं, जुन्या विवाह डिक्रीनुसार, संजय कपूर हे मुलांच्या शिक्षणाची आणि खर्चाची जबाबदारी घेत होते. आता संपूर्ण संपत्ती प्रिया कपूर हिच्या ताब्यात आहे आणि समायरा हिची फी गेल्या दोन महिन्यांपासून भरलेली नाही… त्यामुळे संजय कपूर यांच्यानंतर ही जबाबदारी प्रिया कपूर यांच्यावर आहे. कारण सध्या संजय कपूर यांची संपत्ती प्रिया हिच्या ताब्यात आहे…
दरम्यान, प्रिया कपूरची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील राजीव नायर यांनी न्यायालयात हे आरोप फेटाळून लावले. नायर यांनी सांगितल्यानुसार, प्रियाने नेहमीच मुलांचा खर्च उचलला आहे आणि तिचे सर्व दायित्वे वेळेवर निभावली आहेत. फी भरली नाही… यांसारखे आरोप फक्त माध्यमांचं लक्ष वेधण्यासाठी करण्यात येत आहेत.
करिश्माची मुलं प्रिया म्हणतात ‘सिंड्रेला स्टेपमदर’
करिश्माच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्युपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. ते खरे नसल्याचं आणि त्यांना त्यावर पूर्ण विश्वास नसल्याचं कोर्टात म्हटलं होतं. प्रिया कपूर ‘सिंड्रेला स्टेपमदर’ आहे. प्रिया अनेकदा तिच्या मुलांच्या हितापेक्षा स्वतःचे हित जास्त मानते.
यावर प्रियाने उत्तर दिलं, मुलांना कुटुंब ट्रस्टकडून 19 कोटी आधीच मिळाले आहेत. मुलांना जे काही द्यायचं होतं, ते वेळेत देण्यात आलं आहे. करिश्माच्या मुलांना 19 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर करिश्मा हिच्याकडे जवळपास 120 कोटी रुपये आहेत. तर, मुलांच्या शाळीची फी भरण्यासाठी देखील पैसे नाहीत का? यांसारखे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
