AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करिश्मा कपूरच्या सवतीची लेक, किन्नर समाजासाठी करते असं काम, जगातील मोठ्या मुद्द्यांवर ठेवते लक्ष

Karisma Kapoor Ex Husband Sunjay Kapoor Death: किन्नर समाजासाठी करिश्मा कपूरच्या सवती मुलगी घेते पुढाकार, एवढंच नाही तर, जगातील मोठ्या मुद्द्यांवर ठेवते लक्ष, कोण आहे ती?

करिश्मा कपूरच्या सवतीची लेक, किन्नर समाजासाठी करते असं काम, जगातील मोठ्या मुद्द्यांवर ठेवते लक्ष
फाईल फोटो
| Updated on: Jun 15, 2025 | 1:39 PM
Share

अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती संजय कपूर याचं 12 जून रोजी लंडन याठिकाणी निधन झालं. पोलो खेळताना संजयच्या तोंडाच मधमाशी गेली. श्वास कोंडल्यामुळे त्याला हृदय विकाराचा झटका आला आणि त्याने अखेरचा श्वास घेतला. ‘मी काहीतरी गिळलं आहे…’ एवढं म्हणाला आणि संजय कपूरने श्वास सोडला. लंडमध्ये निधन झाल्यामुळे आता संजय याचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. पण त्यासाठी विलंब होत आहे. निधनानंतर संजय त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

संजय याला चार मुलं असून उद्योजक तिसरी पत्नी प्रिया सचदेव हिच्यासोबत शाही आयुष्य जगत होता. प्रिया हिने घटस्फोटानंतर संजय याच्यासोबत दुसरं लग्न 2017 मध्ये केलं. प्रिया हिचं पहिलं लग्न 2006 मध्ये मॉडेल, अभिनेता आणि उद्योजक विक्रम चटवाल याच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगी देखील आहे. जीचं नाव सफारी चटवाल असं आहे. सफारी चटवाल नक्की कोण आहे आणि काय करते याबद्दल जाणून घेवू…

सफारी चटवाल 19 वर्षांची आहे. ती सध्या इंग्लंडमधील मार्लबरो कॉलेजमध्ये शिकते आणि तिला आंतरराष्ट्रीय संबंध आणि समकालीन भू-राजकीय मुद्द्यांमध्ये रस आहे. भारतात राहताना सफिरा हिचं लक्ष याच विषयांवर होते. ती डिप्लोमसी 2030 ची संस्थापक देखील आहे.

रिपोर्टनुसार, सफीरा हिचा जेव्हा जन्म झाला तेव्हा किन्नर घरी आले होते आणि सोहळा करून पैसे घेवून गेले. पण सफीराच्या कुटुंबियांना ते काही आवडलं नाही. त्यानंतर सफिरा हिने भारतातील ट्रान्सजेंडर समाजासोबत होणाऱ्या गैरवर्तनाला तोंड देण्यासाठी एक उपक्रम सुरू केला आणि त्याला प्रोजेक्ट राईट (Real Inclusion in Gender Health Treatment) असं नाव दिलं. उपक्रमाअंतर्गत राईटचा वापर ट्रान्सजेंडर समुदाय त्यांच्या आरोग्यसेवेच्या गरजा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करण्यासाठी करू शकतो.

भारतात होणार संजय कपूर याच्यावर अंत्यसंस्कार…

इंग्लंडमध्ये मृतदेह असल्यामुळे संजय कपूर याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास विलंब होत आहे. रिपोर्टनुसार. संजय हा अमेरिकन नागरिक होता आणि त्याचे निधन लंडनमध्ये झालं, त्यामुळे त्याचं शरीर भारतात परत आणण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची झाली आहे.

संजय कपूर याचे सासरे, म्हणजे तिसरी पत्नी प्रिया सचदेव हिचे वडील अशोक सचदेव यांनी अपडेट दिले की, ‘पोस्टमार्टम अजूनही सुरू आहे. कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर, मृतदेह अंतिम संस्कारांसाठी भारतात आणला जाईल.’ सध्या सर्वत्र संजय कपूर याच्या निधनाची चर्चा सुरु आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.