AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करीनाने सैफसोबतच्या नात्याबद्दल सांगताच अशी होती करिश्माची पहिली प्रतिक्रिया

करिश्मा जेव्हा लंडनमध्ये एका चित्रपटासाठी शूटिंग करत होती, तेव्हा करीनाने तिला फोन करून सैफसोबतच्या नात्याविषयी सांगितलं. यावेळी करिश्माच्या पायाखालची जमिनच सरकली होती. तिची पहिली प्रतिक्रिया काय होती, याविषयी करिश्माने कपिल शोमध्ये सांगितलंय.

करीनाने सैफसोबतच्या नात्याबद्दल सांगताच अशी होती करिश्माची पहिली प्रतिक्रिया
सैफ अली खान, करीना कपूर आणि करिश्मा कपूरImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 13, 2024 | 10:46 AM
Share

अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर ही बहिणींची जोडी बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत यशस्वी कलाकारांपैकी एक आहे. आधी करिश्मा आणि त्यानंतर करीना.. अशा पद्धतीने गेली चार दशकं या बहिणींनी बॉलिवूड गाजवलंय. या दोघी बहिणींचं ऑफस्क्रीन नातंही अनेकदा चर्चेत आलंय. अगदी जिवाभावाच्या मैत्रिणींसारखं या दोघींमध्ये नातं आहे. नुकत्याच या दोघी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या कॉमेडी शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी दोघींनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही गप्पा मारल्या. शोमध्ये करीनाचा पती आणि अभिनेता सैफ अली खानचाही उल्लेख होतो. सैफने ‘हम साथ साथ है’ या चित्रपटात करिश्माच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. त्यामुळे जेव्हा करीना आणि सैफच्या नात्याविषयी समजलं, तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय होती, याविषयी करिश्मा कपूर मोकळेपणे व्यक्त झाली.

“त्यावेळी मी लंडनला एका शूटिंगसाठी गेले होते. सैफबद्दल सांगण्याआधी करीनाने मला चक्क आधी कुठेतरी बसायला सांगितलं होतं. ती असं का सांगत होती, असा प्रश्न मला पडत होता. तरीसुद्धा लंडनमध्ये शॉपिंग करताना मी एका दुकानातील सोफ्यावर बसले. तेव्हा तिने मला सांगितलं की ती सैफच्या प्रेमात आहे. आम्ही दोघं एकमेकांसोबत आहोत आणि आम्ही एकमेकांना डेट करतोय, असं ती म्हणाली. हे ऐकून मी सोफ्यालाच घट्ट धरून बसले. ते सगळं समजून घेण्यासाठी मला थोडा अवधी लागला. कारण सैफ माझा मित्र आणि सहकलाकार होता”, असं करिश्मा सांगते. हे ऐकून उपस्थित प्रेक्षकांसह करीनालाही हसू अनावर होतं.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

या शोमध्ये कपिल करीनाला तिच्या लव्हस्टोरीबद्दल प्रश्न विचारतो. सर्वांत आधी कोणी कोणाला प्रपोज केलं, असं तो विचारतो. त्यावर उत्तर देताना करीना सांगते, “माझा स्वभाव पाहता, मीच सर्वांत आधी प्रेमाची कबुली देणारी असायला हवी. आमच्या नात्याबद्दल माझ्या मनात ज्या भावना होत्या, त्या सर्वांत आधी मला सैफलाच थेट सांगायच्या होत्या. प्रत्येकाला माहीत आहे की मी माझी फेव्हरेट आहे. त्यामुळे कोणाला काही सांगण्याआधी मला त्याला सर्वांत आधी सांगायचं होतं.”

करीना आणि सैफने 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न केलं. या दोघांना तैमुर आणि जेह ही दोन मुलं आहेत. करिश्मा नुकतीच नेटफ्लिक्सच्या ‘मर्डर मुबारक’ या शोमध्ये झळकली होती. यासोबतच ती ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिॲलिटी शोमध्ये परीक्षकपदावर आहे. तर दुसरीकडे करीनाचा ‘द बकिंगहम मर्डर्स’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. ती लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम रिटर्न्स’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये करीनासोबतच अजय देवगण, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांच्या भूमिका आहेत.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.