Katarina Kaif : लग्नानंतरच्या पहिल्या चित्रपटासाठी कतरिना तयार, सिनेमाच्या नावाचीही घोषणा, पाहा कधीपासून सुरु होणार शुटिंग?

Katrina Kaif Merry Christmas : ख्रिसमस या चित्रपटाचे शूटिंग दक्षिण मुंबईत सुरु होणार असून विविध ठिकाणी शूटिंगचे प्लॅन आहेत. श्रीराम राघवन हे आपल्या चित्रपटांची शूटिंग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ओळखले जातात. या चित्रपटाचे शूटिंग जवळपास २ महिन्यात पूर्ण होणार आहे.

Katarina Kaif : लग्नानंतरच्या पहिल्या चित्रपटासाठी कतरिना तयार, सिनेमाच्या नावाचीही घोषणा, पाहा कधीपासून सुरु होणार शुटिंग?
कतरिना कैफ
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 4:39 PM

मुंबई : अभिनेता विकी कौशलबरोबर (Vicky Kaushal) लग्नबंधनात अडकून अभिनेत्री कतरिना कैफला (Katrina Kaif)  जेमतेम एक महिना झालाय. पण लग्नाच्या एका महिन्यानंतर कतरिना कैफ पुन्हा आपल्या आगामी प्रोजेक्टकडे बारीक लक्ष देऊन आहे. ख्रिसमसच्या खास मुहूर्तावर कतरिनाने तिच्या आगामी ‘मेरी ख्रिसमस’ (merry Christmas) या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन (shriram raghwan) करणार आहेत. १० फेब्रुवारीला कतरिना या चित्रपटाचे शूटिंग मुंबईतील फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये करणार आहे. युनिटच्या जवळच्या एका सूत्राने एंटरटेन्मेंट टाईम्सला सांगितलं की, “कॅतरिना कैफ 10 फेब्रुवारीपासून श्रीरामसोबत शूटिंग करणार आहे आणि काहीच चित्रपटात शूटिंग पूर्ण करेल”

ख्रिसमस या चित्रपटाचे शूटिंग दक्षिण मुंबईत सुरु होणार असून विविध ठिकाणी शूटिंगचे प्लॅन आहेत. श्रीराम राघवन हे आपल्या चित्रपटांची शूटिंग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ओळखले जातात. या चित्रपटाचे शूटिंग जवळपास २ महिन्यात पूर्ण होणार आहे. हा चित्रपट मुंबईवर आधारित आहे पण पुण्यात लहानाचा मोठा झालेला श्रीराम काही दिवस महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतही शूटिंग करणार आहे.

कतरिनाकडून सिनेमाच्या टीमसोबत खास फोटो शेअर

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांना ख्रिसमसच्या दिवशी एकत्र लॉन्च करण्यात आले. कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर को-स्टार आणि टीमसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिनं लिहिलं, “नवीन सुरुवात… दिग्दर्शक श्रीराम राघवनसोबत ‘मेरी ख्रिसमसच्या सेटवर पुन्हा एकदा परत…” मला श्रीराम राघवनसोबत काम करण्याची नेहमीच इच्छा होती, थ्रिलर कथांचा विचार केल्यास तो एक मास्टर आहे आणि तो दिग्दर्शन करतोय म्हटल्यावर तर ती एक सन्मानाची गोष्ट आहे.”

विकी कतरिनाचं शाही लग्न!

कतरीना आणि विकीने 9 डिसेंबर रोजी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सात फेरे घेतले. आपल्या 6 वर्षांच्या करिअरमध्येच विकीने कतरीनाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि पुढच्या काहीच महिन्यात सगळ्यांना 440 व्होल्टचा करंट देत राजस्थानच्या आलिशान महालात लग्नही केलं.

राजस्थानपासून मुंबईपर्यंतच्या विकी कॅटच्या फोटोंची सर्वत्र चर्चा

विकी आणि कतरीनाने शाही पद्धतीने विवाह केला. त्यांच्या लग्नाचे अनेक सुंदर फोटो चाहत्यांना पहायला मिळाले. त्यांच्या लग्नाला काही मोजकीच मंडळी उपस्थित होती. लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला. काही जणांनी तर भन्नाट मीम्सही बनवले. गेल्या महिन्यात बॉलिवूडमध्ये याच लग्नाची चर्चा झाली.

संबंधित बातम्या

Saami Saami | Video | आजीबाई जोमात, आजीबाईंचे ठुमके पाहून रश्मिका आणि समांथाही कोमात! दादी नव्हे, ‘मौज कर दी!’

Video | आधी ठसन दिली, मग विजय थलापतीनं विजय सेतूपतीला मिठी मारली! असं का केलं?

Makar Sankranti 2022 : हेमा मालिनीपासून अक्षय कुमारपर्यंत, मकर संक्रांतीच्या कुणी कशा शुभेच्छा दिल्या?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.