कतरिना कैफचे लक्झरी किचन; जेवणासाठी चक्क 24 कॅरेट सोन्याच्या प्लेट अन् लाखोंचा किचन सेट…
अभिनेत्री कतरिना कैफने नुकतेच तिच्या किचनला रेनोवेट केले असून तब्बल 45 लाखांचे लक्झरी किचन तिने बनवून घेतले आहे. तिने तिच्या किचनसाठी अतिशय महागड्या आणि लक्झरी लूकचा सेट मागवला आहे. अगदी ओव्हनपासून ते किचन सिंकपर्यंत अगदी सगळंच खास आहे. एवढंच नाही तर जेवणासाठी चक्क 24 कॅरेट सोन्याच्या प्लेट्सही तयार करून घेतल्याचं म्हटलं जातं.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ नुकतीच आई झाली आहे. तिला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. तिच्या नवीन प्रवासासाठी चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कतरिना तिच्या साध्या पण उत्कृष्ट जीवनशैलीसाठी नेहमीच ओळखली जाते. तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, ती तिच्या घरातील गोष्टींवर आणि तसेच इंटेरिअरवर देखील खूप लक्ष देते. बऱ्याचदा विकी कौशलने देखील हे मुलाखतींमध्ये सांगितले आहे. याच दरम्यान अशी एक बातमी समोर आली आहे की कतरिनाने तिचे संपूर्ण किचन रेनोवेट केलं आहे. पण त्यासाठी तिने तेवढा पैसाही खर्च केला आहे.
कतरिनाच्या लक्झरी किचनची झलक
अलीकडेच, तिच्या घराच्या स्वयंपाकघराची झलक सोशल मीडियावर दिसल्याने चर्चा सुरु झाल्या होत्या. असे म्हटले जाते की कतरिनाने तिचं लक्झरी किचनसाठी सेट हा परदेशातून आयात केला आहे, ज्याची किंमत सुमारे 45 लाख आहे. त्याला फक्त स्वयंपाकघर नाही तर त्याला लक्झरी आर्ट पीस म्हटलं जातं. जे प्रत्येक घटक कस्टम-मेड आणि डिझायनर टचने बनवलेला आहे.
जेवणासाठी 24 कॅरेट सोन्याचा मुलामा चढवलेल्या प्लेट
वृत्तांनुसार, कतरिना कैफचे हा किचन सेट इटलीच्या फ्लोरेन्स येथून आयात करण्यात आला होता. तो ‘मोल्टेनी अँड सी’ या जगप्रसिद्ध लक्झरी होम ब्रँडने हा किचन सेट डिझाइन करण्यात आला आहे. हा ब्रँड हँडक्राफ्टेड किचन फर्निशिंग और प्रीमियम क्वालिटी मटेरियल्ससाठी ओळखले जाते.या सेटमध्ये वापरलेले प्रत्येक हँडल, कॅबिनेट आणि प्लेट शेल्फ पूर्णपणे हँडक्राफ्टेड आहे. सिंक आणि काउंटरटॉप्स देखील इटालियन मार्बलने सजवलेले आहेत, ज्यामुळे त्याची किंमत आणखी वाढते आणि त्याचा महागडा लूक दिसून येतो. एवढंच नाही तर 24 कॅरेट सोन्याचा मुलामा चढवलेल्या प्लेटही जेवणासाठी वापरण्यात येतात असं म्हटलं जातं.
स्वयंपाकघरात काय खास आहे?
कतरिनाचे स्वयंपाकघर टेक्नोलॉजी आणि लक्झरी यांचे उत्तम मिश्रण आहे. त्यात स्मार्ट कुकिंग सिस्टम, टच-सेन्सिटिव्ह कॅबिनेट आणि ऑटोमॅटिक टेम्परेचर ओव्हन सारख्या वस्तूंचा समावेश आहे. किचनचा हा लूक युरोपियन किचनसारखाट डिझाइनचा लूक देतो.
View this post on Instagram
कतरिनाचे लक्झरी होम चॉईसेस
कतरिना नेहमीच नॅच्यूअरल आणि मिनिमलिस्ट थीम करणे पसंत करते. ती आणि तिचा पती विकी कौशल, त्यांच्या मुंबईतील सी-फेसिंग घरात राहतात, ज्याचे इंटीरियर हे लंडन आणि युरोपियन डिझायनर टीमने डिझाइन केले आहे. कतरिना कैफला स्वत: जेवण बनवायला आवडतं त्यामुळे ती बहुतेकदा घरी स्वत:च जेवण बनवत असते. ती तिच्या डाएटच्याबाबतीत नेहमीच सतर्क असते आणि तिचा आहारही तसाच निरोगी असतो.
किंमत आणि चर्चा
कतरिनाच्या किचनमधील अंदाजे 45 लाख किमतीच्या या इटालियन किचन सेटने सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. चाहते तिच्या या किचनला “भारतातील सर्वात महागडे सेलिब्रिटी किचन” म्हणत आहेत.
