‘कॉफी विथ करण 8’मध्ये दीपिका रणवीरबद्दल असं का म्हणाली? भडकले नेटकरी

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. 'कॉफी विथ करण 8'मध्ये या दोघांनी त्यांच्या नात्याविषयी मोकळेपणे भाष्य केलं. करण जोहरसोबत बोलताना दीपिकाने रणवीरविषयी असं काही सांगितलं, जे ऐकून नेटकऱ्यांचा चांगलाच पारा चढला आहे.

'कॉफी विथ करण 8'मध्ये दीपिका रणवीरबद्दल असं का म्हणाली? भडकले नेटकरी
Ranveer Singh and Deepika PadukoneImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 27, 2023 | 2:20 PM

मुंबई : 27 ऑक्टोबर 2023 | करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय चॅट शोचा आठवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी हजेरी लावली होती. या एपिसोडमध्ये दोघांनी विविध मुद्द्यांवर मोकळेपणे चर्चा केली. त्यांच्या लग्नाचाही व्हिडीओ या शोमध्ये पहिल्यांदा दाखवण्यात आला. त्यानंतर करणसोबत गप्पा मारताना दीपिकाने रणवीरसोबतच्या नात्यावर असं काही वक्तव्य केलं, ज्यामुळे सोशल मीडियावर आता नेटकरी भडकले आहेत. दीपिकाला तिच्या वक्तव्यामुळे ट्रोल केलं जातंय.

रणवीरसोबतच्या नात्याविषयी दीपिका म्हणाली, “सुरुवातीला मी त्याच्यासोबतच्या रिलेशनशिपबद्दल गंभीर नव्हती. मला सिंगल रहायचं होतं. कारण त्याआधीच मी दोन कठीण रिलेशनशिपमधून बाहेर पडले होते. मला कोणालाच कमिटमेंट द्यायची नव्हती. सुरुवातीला मी रणवीरसोबतही सीरिअस नव्हती. मात्र जेव्हा त्याने मला लग्नासाठी प्रपोज केलं, तेव्हापासून मी त्याला गंभीर विचार करू लागले होते.”

हे सुद्धा वाचा

“मात्र त्यावेळीही आम्ही दोघं ओपन रिलेशनशिपमध्ये होतो. असं असूनही आम्ही दोघं एकमेकांपासून फार लांब राहू शकलो नाही”, असंही तिने पुढे स्पष्ट केलं. दीपिकाची हीच गोष्ट नेटकऱ्यांनी आणि तिच्या चाहत्यांना आवडली नाही. या कारणामुळे तिला जोरदार ट्रोल केलं जातंय. दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘रणवीरच्या डोळ्यातील दु:ख मी पाहू शकतो. मला खरंच त्याच्यासाठी वाईट वाटतंय’, असं एकाने लिहिलं. तर ‘दीपिकाने याची जाहीर कबुली दिली की रणवीरला डेट करत असताना ती दुसऱ्या व्यक्तीसोबतही रिलेशनशिपमध्ये होती’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

दीपिका आणि रणवीरने नोव्हेंबर 2018 मध्ये लग्न केलं. इटलीतील लेक कोमो याठिकाणी दोघांनी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला मोजकेच पाहुणे आणि मित्रपरिवार उपस्थित होता. त्यानंतर त्यांनी बेंगळुरू आणि मुंबई या दोन ठिकाणी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘रामलीला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणवीर आणि दीपिका एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्नाआधी सहा वर्षे दोघं एकमेकांना डेट करत होते. 2015 मध्ये गुपचूप साखरपुडा उरकल्याचंही रणवीरने या शोमध्ये सांगितलं.

Non Stop LIVE Update
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?.
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?.
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी....
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?.
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची.
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?.
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?.
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर.
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल.