AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूरजच मास्टरमाईंड, आम्ही मूर्ख..; ‘बिग बॉस मराठी’बद्दल अंकिता वालावलकरची पोलखोल

बिग बॉसच्या घरात गेल्यावर नेमकं काय होतं आणि कोण कसा खेळ खेळतो, याविषयीची पोलखोल इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने केली आहे. त्याचसोबत तिने सूरज चव्हाणला खरा मास्टरमाईंड असल्याचं म्हटलंय.

सूरजच मास्टरमाईंड, आम्ही मूर्ख..; 'बिग बॉस मराठी'बद्दल अंकिता वालावलकरची पोलखोल
Ankita Walawalkar and Suraj ChavanImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 20, 2026 | 10:43 AM
Share

‘बिग बॉस मराठी’चा सहावा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. याआधी पाचव्या सिझनचं विजेतेपद सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने पटकावलं होतं. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक स्पर्धक आपापली वेगळी रणनिती, प्लॅनिंग घेऊन येतो आणि त्यानुसार खेळू लागतो. त्यात काही जण ग्रुपच्या मदतीने पुढे जातात, तर काही जण वैयक्तिक ओळख बनवून घरात टिकून राहतात. सूरजसुद्धा असाच काहीसा होता. बिग बॉसच्या पाचव्या सिझनचा खरा मास्टरमाईंड हा सूरज चव्हाणच होता, अशी प्रतिक्रिया आता त्याच सिझनमधील स्पर्धक ‘कोकण हार्टेड गर्ल’ ऊर्फ अंकिता वालावलकरने दिली आहे. सूरजला खूप आधीपासूनच गेम कळला होता, आम्ही मूर्ख ठरलो, अशी भावना तिने या मुलाखतीत व्यक्त केली.

सूरज चव्हाणने त्याच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेऊन तोच कार्ड वापरल्याची टीका अनेकांनी केली होती. याबाबत अंकिता म्हणाली, “सोशल मीडियावर इमोशन्स विकले जातात. जेवढा तुम्ही भावनिक कंटेंट द्याल, तेवढं ते लोकांना आकर्षित करणार. सोशल मीडियावर काय विकायचं, ते कसं विकलं जाणार, हे सर्व त्या व्यक्तीला बरोबर माहीत असतं. त्यामुळे कुठलाही व्यक्ती बिचारा नाही. सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या भावनांमध्ये वाहून जाऊ नका. रिअॅलिटी शोजमध्ये जसं तुम्ही जातीवाचक काही बोलू शकत नाही, तसंच आता परिस्थितीवाचकही बोलायला बंदी हवी. गरीबी, बेताची परिस्थिती यांवर बोलू नका. आमच्या सिझनचा खरा मास्टरमाईंड तर सूरजच होता.”

“सूरजचा भोळेपणा पाहून त्याला गेम कळतच नाहीये, असा भ्रम आम्हाला झाला होता. पण त्याला खूप आधीच तो समजला होता. आम्ही जेव्हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलो, तेव्हा आम्हाला याची जाणीव झाली. त्यामुळे तोच खरा मास्टरमाईंड आहे. आम्ही मूर्ख होतो. स्वत:ला कसं दाखवायचं, हे त्याला बरोबर माहीत होतं. मला बिग बॉसच्या घरात काय करायचं, हे कळतच नव्हतं. तुम्ही कितीही चांगले वागलात तरी टीव्ही काय दाखवायचं, हे त्यांच्या हातात आहे. मी बिग बॉसचे कोणतेच एपिसोड्स आधी न बघता थेट घरात स्पर्धक म्हणून गेले होते. त्यामुळे नेमकं काय करायचं, कसं खेळायचं हे मला सुरुवातीलाच समजत नव्हतं. तुम्ही दिसत नाही, असं मला कायम सांगितलं जायचं. पण त्यामुळे ते बाहेरही काढत नव्हते. बरं जे दिसत होते, त्यांनाही ते ओरडत होते. त्यांना ओरडण्याने काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे नेमकं करायचं काय, याच संभ्रमात मी शेवटपर्यंत होते”, असं अंकिताने स्पष्ट केलं.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?