लहान बहिणीच्या लग्नात कृति सेननचा जलवा, लहंग्यामधील लुकने आणि डान्सने वेधलं सर्वांचं लक्ष
नूपुर सेनन आणि स्टेबिन बेन हे आज विवाहबंधनात अडकणार असून त्यांच्या वेडिंग सोहळ्यातील कृति सेननच्या लुकने आणि ब्लाउजने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Nupur Sanon and Stebin Ben Wedding : बॉलिवूड अभिनेत्री कृति सेननची बहीण नूपुर सेनन आणि गायक स्टेबिन बेन हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर आता अखेर तो क्षण आला आहे ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असून त्यांचा भव्य डेस्टिनेशन वेडिंग सोहळा उदयपूरमध्ये पार पडत आहे. लग्नाच्या विविध कार्यक्रमांसाठी कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळी देखील आधीच उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत.
लग्नाच्या आधी पार पडलेल्या हळदी समारंभात पारंपरिक अंदाजात सजलेली नूपुर अतिशय सुंदर दिसत होती. त्यानंतर संगीत समारंभातही नूपुरने आपल्या सौंदर्याने सर्वांची मने जिंकली. तिने रंगीबेरंगी लहंगा परिधान केला होता. विशेष म्हणजे, लहंग्यासोबत तिने मॅचिंग ब्लाउजऐवजी गोल्डन रंगाचा चमकदार ब्लाउज घातला होता. तिचा हा लुक अतिशय राजेशाही वाटत होता. याचबरोबर नूपुरने दागिन्यांचीही खास निवड केली होती. ज्यामध्ये चोकर नेकलेस, मांगटीका आणि वजनदार झुमके यामुळे तिचा हा लुक अधिकच खुलून दिसत होता.
दरम्यान, बहिणीच्या संगीत समारंभात कृति सेनननेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नूपुरला टक्कर देईल असा लुक कृतिने साकारला होता. तिने पारंपरिक छोट्या ब्लाउजऐवजी सिंपल ब्लाउज परिधान केला होता. या ब्लाउजची डीप व्ही नेकलाइन आणि मिरर वर्क तिच्या लुकला मॉडर्न टच देत होते. ब्लाउजच्या बॉर्डरवर विविध आकारांचे चमकदार मिरर लावलेले होते जे तेथील सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
View this post on Instagram
या सोहळ्यासाठी कृतिने गुलांबी रंगाचा लहंगा निवडला होता. ज्यावर निळ्या रंगाची हलकी छटा देण्यात आली होती. या घेरदार लहंग्यावर सर्वत्र मिरर वर्क आणि बारीक धाग्यांची सुंदर एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. रात्री झालेल्या संगीत कार्यक्रमात कृतिचा हा लहंगा विशेष उठून दिसत होता.
View this post on Instagram
दागिन्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कृतिने दागिन्यांची उत्कृष्ट निवड केली होती. तिचा हा लूक सध्या सोशल मीडियावर देखील चर्चेत आला आहे. या लग्नसोहळ्यात कृति आणि नूपुर यांच्या आईंच्या लुकने देखील लक्ष वेधून घेतले. त्यांनी लहंगा न घालता लाल रंगाचा सुंदर शरारा सूट परिधान केला होता. नूपुर सेनन आणि स्टेबिन बेन यांच्या लग्नाच्या सोहळ्याने ग्लॅमर, सौंदर्य आणि कुटुंबीयांच्या आनंदाचे सुंदर दर्शन घडवले असून या शाही विवाहसोहळ्याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
