Jhimma : चला खेळूया ‘झिम्मा’ म्हणत क्षिती जोग झळकणार नव्या भूमिकेत

मराठी, हिंदी मालिका, सिनेमा, नाटक अशा विविध माध्यमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्यानंतर क्षिती जोग घराघरात पोहोचली आहे. आजवर अभिनेत्री म्हणून नावाजलेली क्षिती आता मराठी सिनेसृष्टीत एक नवीन भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. (Kshiti Jog playing a new role in the marathi movie 'Jhimma')

Jhimma : चला खेळूया ‘झिम्मा’ म्हणत क्षिती जोग झळकणार नव्या भूमिकेत
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 2:02 PM

मुंबई : मराठी, हिंदी मालिका, सिनेमा, नाटक अशा विविध माध्यमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्यानंतर क्षिती जोग (Kshiti Jog) घराघरात पोहोचली आहे. आपल्या अप्रतिम अभिनयानं तिनं प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली. आजवर अभिनेत्री म्हणून नावाजलेली क्षिती आता मराठी सिनेसृष्टीत एक नवीन भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. क्षिती आता ‘चलचित्र कंपनी’ च्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात प्रवेश करत आहे.

‘झिम्मा’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा क्षितीकडे

‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘झिम्मा’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा क्षिती सांभाळत असून हा चित्रपट 23 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मोठी स्टार कास्ट असलेला ‘झिम्मा’ लवकरच भेटीला

निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासह सिद्धार्थ चांदेकरची भूमिका असलेला ‘झिम्मा’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी सर्वांना उत्सुकता होती. टिझरलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रेक्षकांनीच नाही तर अनेक हिंदी-मराठी कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल्स वरून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे ‘झिम्मा’च्या निमित्ताने हेमंत आणि क्षितीची ही ऑफस्क्रीन जोडी पहिल्यांदाच दिग्दर्शक -अभिनेत्री म्हणून एकत्र काम करणार आहे.

काय आहेत क्षितीच्या भावना

आपल्या निर्मिती क्षेत्रातील नवीन प्रवासाबद्दल क्षिती सांगते, ”खरं सांगायचं तर निर्मिती क्षेत्रात येताना आपल्या जवळचा आपला फेवरेट विषय घेऊन यायचं असं ठरलं होतं आणि झिम्मा ने ती संधी दिली! ज्या पद्धतीचे चित्रपट आपल्याला बघायला आवडतात तसे चित्रपट आपण बनवायचे हे मी पक्क ठरवलं होतं! आता झिम्मा तयार झाल्यावर आपल्या मनासारखं घडल्याचा आनंद आहे! समाधान आहे. प्रवास आणि चित्रीकरणाच्या निमित्ताने झालेला आमच्या सात जणींचा प्रवास खरोखर खूपच रंजक होता. या निमित्ताने मला माझ्या मैत्रिणींसोबत काम करता आले. हेमंतचं दिग्दर्शन जवळुन बघता आलं. पुन्हा प्रेमात पडता आलं. निर्मिती ताई, सुहास ताई यांच्या सहवासातून बरंच काही शिकण्याची संधी मिळाली. खूप मजा आली. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, या गोष्टीचा विशेष आनंद आहे. हा चित्रपटात महिला असल्या तरीही प्रत्येक पुरुषाने हा चित्रपट आवर्जून बघावा असाच आहे.’

वर्षभरानंतर मिळणार नव्या कोऱ्या चित्रपटाची मेजवानी

आज वर्षभराने इतकी मोठी स्टारकास्ट असलेला आणि धमाल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि क्रेझी फ्यू फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. तर इरावती कर्णिक लिखित या चित्रपटाची निर्मिती क्षितीसह स्वाती खोपकर, अजिंक्य धमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपाम मिश्रा यांनीही केली आहे. अमितराज यांचे या चित्रपटाला संगीत लाभले असून संजय मेमाणे यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पहिले आहे.

संबंधित बातम्या

कियारा अडवाणी ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट, नुकतीच एकत्र घेतली होती ज्योतिष्याची भेट!

Anjali Gaikwad | ‘लिटील चॅम्प’ची विजेती मराठमोळी अंजली गायकवाड गाजवतेय ‘इंडियन आयडॉल 12’चा मंच, वाचा तिच्या प्रवासाबद्दल…

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....