बऱ्याच चित्रपटात खलनायकाची भूमिका; वयाच्या 75 व्या वर्षी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची पडद्यावर बोल्ड भूमिका, नेटकऱ्यांकडून ट्रोल
असा एक दिग्गज अभिनेता ज्याने चांगल्या भूमिकांपेक्षाही खलनायकाच्या भूमिकेनं सर्वांना प्रभावित केलं. मात्र वयाच्या 81 व्या वर्षी एका सीरिजमध्ये सुनेचं पात्र असलेल्या अभिनेत्रीसोबतच बोल्ड सीन दिल्यामुळे या भूमिकेसाठी या अभिनेत्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. कोण आहे हा अभिनेता?

हिंदी चित्रपटसृष्टीत असे काही कलाकार आहेत ज्यांचे नाव आणि स्थान कोणीही हटवू शकणार नाही. असाच एक दिग्गज अभिनेता ज्याच्या खलनायकाच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. अनेक चित्रपटात या अभिनेत्याने “खलनायक” ही संकल्पना पुन्हा परिभाषित केली. 60s पासून चित्रपटात आली छाप सोडणारे अभिनेते म्हणजे कुलभूषण खरबंदा. ज्यांनी “शान” चित्रपटात शाकालची भूमिका करून बॉलिवूड प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवली. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्यांनी एका खाजगी बेटावर राहणाऱ्या खलनायकाची भूमिका केली होती. हे पात्र थेट जेम्स बाँडच्या खलनायक “ब्लोफेल्ड” वरून प्रेरित होते आणि कुलभूषण खरबंदा यांनी या भूमिकेसाठी त्यांचा लूक पूर्णपणे बदलला होता. त्यांच्या खलनायकाच्या भूमिकेनेच प्रेक्षकांची मने जिंकली.
1960 पासून अभिनयास सुरुवात
कुलभूषण खरबंदा यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1944 रोजी हसन अब्दल, पंजाब, ब्रिटिश भारत (आता पाकिस्तान) येथे झाला. त्यांचे शिक्षण अलिगड मुस्लिम विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ आणि किरोरी मल कॉलेजमध्ये झाले, जिथे ते ड्रामाटिक सोसायटीचे सक्रिय सदस्य होते. 1960 च्या दशकात त्यांनी दिल्लीच्या थिएटर सर्किटमधून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
बोल्ड सीनमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला
मात्र एका भूमिकेमुळे त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. कुलभूषण खरबंदा “मिर्झापूर” या वेब सिरीजमध्ये बुद्धिमान कुलगुरू “बाउजी” म्हणून भूमिका केली होती. या सीरिजमध्ये त्यांनी खलनायकाचीच भूमिका केली पण सोबतच बोल्डही. या सीरिजमध्ये त्यांनी त्यांच्या सुनेशी जवळीक साधत असल्याचा अभिनय केला आहे. ज्यासाठी त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
सुनेसोबतच बोल्ड सीन दिल्यामुळे नेटकऱ्यांनी दाखवली नाराजी
या सीरिजमध्ये त्यांच्या सुनेची भूमिका केली आहे रसिका दुग्गलने. मिर्झापूरमध्ये तिने बीना त्रिपाठीचे पात्र साकारले आहे. तसेच तिने या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे तिचे सासरे दाखवलेले कुलभूषण खरबंदा यांच्यासोबतही. कुलभूषण खरबंदा यांच्यासोबतचा तिचा सेक्स सीन खूप चर्चेत आला होता. त्यावरून दोघांनाही खूप ट्रोल करण्यात आलं होतं.
अभिनेत्रीने काय दिली प्रतिक्रिया
दरम्यान याबाबत एका मुलाखतीत रसिकाने स्पष्ट केले होते की जरी तिचे पात्र, बीना, ला जास्त स्क्रीन टाइम मिळाला नाही, तरी त्याचा लोकांवर प्रभाव पडला. बोल्ड सीन्सबद्दल ती म्हणाली, “मला ते बोल्ड वाटत नाहीत. कोणताही संबंध पुरुष आणि स्त्रीमध्ये असतो आणि ती एक सामान्य गोष्ट आहे.” तसेच कुलभूषण खरबंदा यांचे आजपर्यंतचे अभिनय आणि भूमिका पाहता त्यांना वयाच्या 75 व्या वर्षी अशा पद्धतीचा बोल्ड सीन केल्याबद्दल त्यांना ट्रोल करण्यात आलं.
