मी मरणार आहे…, सलग 17 दिवस अभिनेत्रीने असं काय केलं ज्यामुळे प्रकृती खालावली?
'क्योंकी सास भी कभी बहू थी', फेम अभिनेत्री अपरा मेहता का म्हणाल्या, 'मी मरणार आहे...', 17 दिवसांचा कालावधी अभिनेत्रीसाठी ठरला त्रासदायक, ज्यामुळे खालावली प्रकृती..., सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi fame Apara Mehta: मोठ्या पडद्यावर काम करण्यापेक्षा छोट्या पडद्यावर काम करणं अधिक कठिण असतं असं म्हणतात. असं अनेकदा टीव्ही सेलिब्रिटींनी देखील सांगितलं आहे. सतत शुटिंग, प्रवास, अवेळी जेवण यांसारख्या अनेक कारणांमुळे सेलिब्रिटींच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. असंच काही ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, फेम अभिनेत्री अपरा मेहता यांच्यासोबत देखील झालं आहे.
सांगायचं झालं तर, चाहते आता ‘क्योंकी सास भी कभी बहू थी 2’ मालिकेसाठी उत्साहित आहेत. मालिकेच्या माध्यमातून जुने कलाकार देखील चाहत्यांच्या भेटीस येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशात अपरा मेहता यांनी मालिके दरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे.
अपरा मेहता म्हणाल्या, ‘2000 हे वर्ष माझ्या करीयरसाठी फार महत्त्वाचं वर्ष ठरलं आहे. कारण मला ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेत सविता विरानी ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या भूमिकेमुळे घरा-घरात मझी चर्चा होऊ लागल. एके दिवशी घरात आलू टिक्की बनवत होती. तेव्हा मला संजय लिला भंन्साळी यांचा फोन आला. त्या मला सांगितलं ‘देवदास’ सिनेमा करत आहे.’
‘सिनेमात एक छोटी भूमिका आहे ती करायला तुला आवडेल का? हे ऐकल्यानंतर मी चकित झाले. तेव्हा मला यशाच्या शिखरावर पोहोचायचं होतं. त्यमुळे मी ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिका आणि ‘देवदास’ सिनेमात काम करण्यास सुरुवात केली.’
‘सलग 17 दिवस शुटिंग केलं. जेव्हा देवदासच्या शुटिंगसाठी जायची तेव्हा माझे डोळे लाल झालेले असायचे. मी दिवस रात्र काम केलं. त्यानंतर मला असं वाटलं की मी आता मरणार आहे. पण तो देखील एक अनुभव होता. देवसाच्या सेटवर जाऊन मी प्रचंड आनंद असायचे.’ असं देखील अपरा मेहता म्हणाल्या.
सांगायचं झालं तर, ‘देवदास’ सिनेमासाठी अपरा यांचं शूट 12 दिवसांसाठी होतं. सिनेमा आणि मालिका एकाच वेळी करणं सोपं असेल असं त्यांना वाटलं. पण शुटिंगनंतर अपरा यांची प्रकृती खालावली होती. अपरा यांनी अनेक मालिका आणि सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.