Lady Gaga | लेडी गागाचे चोरी झालेले श्वान अखेर सापडले, शोधणाऱ्याला मिळाले तब्बल ‘इतके’ कोटी!

सुप्रसिद्ध पॉपस्टार लेडी गागाकडे असलेले हे फ्रेंच बुलडॉग्स अतिशय महाग आणि नामांकित ब्रीडचे आहेत, ज्यांची किंमत हजारो डॉलर्स आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:26 PM, 27 Feb 2021
Lady Gaga | लेडी गागाचे चोरी झालेले श्वान अखेर सापडले, शोधणाऱ्याला मिळाले तब्बल ‘इतके’ कोटी!
लेडी गागा तिच्या पाळीव श्वानांसह...

मुंबई : सुप्रसिद्ध हॉलिवूड पॉपस्टार लेडी गागा (Lady Gaga) हिचे चोरी झालेले पाळीव श्वान (Pet Dogs) शोधण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बंदुकीचा धाक दाखवून अपहरण लेडी गागाच्या या पाळीव कुत्र्यांचे अपहरण करण्यात आले होते. या अपहृत कुत्र्यांचा शोध लॉस एंजेलिस पोलिसांनी घेतला आहे. एका अज्ञात महिलेने लेडी गागाचे हे दोन्ही पाळीव श्वान ऑलिम्पिक कम्युनिटी पोलिस स्टेशनमध्ये आणल्याची माहिती सध्या समोर येत आहे. कोजी (Koji) व गुस्ताव (Gustav) अशी या श्वानांची नावे आहेत (Lady Gaga Pet dogs found safely after got kidnapped).

त्यानंतर पोलिसांनी लेडी गागाच्या प्रवक्त्याला बोलावून, ते दोघेही लेडी गागाचे चोरी झालेले पाळीव श्वान असल्याची पुष्टी करून घेतली. तथापि, लेडी गागाच्या या पाळीव श्वानांच्या अपहरणाचा हेतू काय होता आणि हे श्वान त्या अज्ञात महिलेपर्यंत कसे पोहोचले, ही माहिती सध्या समोर आलेली नाही. पोलीस अद्याप याचा तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी एक मनुष्य लेडी गागा तीन पाळीव श्वानांसह फिरताना दिसला होता. या तीन श्वानांपैकी एकाने अपहरणादरम्यान पळ काढला होटा. त्यामुळे तो बचावला आणि सुखरुप बाहेर आला.

अपहरण नाट्यात एक व्यक्ती जखमी!

बुधवारी रात्री एक बंदूकधारी व्यक्ती या दोन्ही श्वानांचे अपहरण करून पळून गेला होता आणि या दरम्यान त्याने एका 30 वर्षीय तरूणाला गोळ्या देखील घातल्या होत्या. हा जखमी व्यक्ती सध्या रुग्णालयात दाखल झाला असून, उपचार घेत आहे (Lady Gaga Pet dogs found safely after got kidnapped).

श्वान शोधणाऱ्याला कोटींचे इनाम!

सेलिब्रिटी वेबसाईट टीएमझेडच्या वृत्तानुसार, लेडी गागाला तिचे हे श्वान प्रचंड प्रिय आहेत आणि तिला काहीही करून त्यांच्यापर्यंत पोहोचायचे होते. यासाठी लेडी गागाने KojiandGustav@gmail.com  असा एक ईमेल आयडी देखील जारी केला होता. कोजी आणि गुस्ताव यांना शोधून आणणाऱ्यास लेडी गागाने पाच लाख डॉलर्स अर्थात 3.65 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

दोन्ही श्वान लेडी गागाच्या हवाली

आता लेडी गागाचे हे दोन्ही श्वान सापडले आहेत. दोघांना पाहून तिला प्रचंड आनंद झाला असून, तिने आपला हा आनंद जाहीर रित्या व्यक्त केला आहे. प्राणप्रिय श्वानांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातल्याबद्दल तिने रायन फिशरचे देखील आभार मानले आहेत.

सुप्रसिद्ध पॉपस्टार लेडी गागाकडे असलेले हे फ्रेंच बुलडॉग्स अतिशय महाग आणि नामांकित ब्रीडचे आहेत, ज्यांची किंमत हजारो डॉलर्स आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेडी गागा सध्या एका चित्रीकरणासाठी रोममध्ये आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lady Gaga (@ladygaga)

(Lady Gaga Pet dogs found safely after got kidnapped)

हेही वाचा :

Video : टॉपलेस फोटोशूटमुळे ट्रोल झाली दिव्या अग्रवाल, ट्रोलर्सवर संतापत म्हणाली….

‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चित्रपटातील परिणीती चोप्राचा अभिनय पाहाच!