Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नाही, डाॅक्टर म्हणाले सर्वांनी प्रार्थना करा!

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नाही, डाॅक्टर म्हणाले सर्वांनी प्रार्थना करा!
लता मंगेशकर

गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू आहेत. मात्र, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झालेली नाहीये.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 16, 2022 | 11:02 AM

मुंबई : गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू आहेत. मात्र, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झालेली नाहीये. गेल्या आठवडाभरापासून लता मंगेशकर या रूग्णालयामध्ये दाखल आहेत. लताजींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, लताजी अजूनही आयसीयूमध्ये आहेत, तरीही लताजींना काळजीची गरज आहे. त्यामुळेच त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाही

लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाचाही लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना आणखीन काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. यावेळी बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, लताजी किती दिवसांत बऱ्या होतील हे सांगणे कठीण आहे. लोकांनी लताजी यांच्यासाठी प्रार्थना करावी, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. लता मंगेशकर यांचं वय आणि त्यांची प्रकृती पाहता त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांचं सध्या वय 92 वर्ष आहे. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सगळीकडे प्रार्थना केल्या जात आहेत.

लता मंगेशकर यांचा अनेक पुरस्कारांनी सम्मान

गानकोकीळा लता मंगेशकर यांनी वयाची 92 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला. लतादीदींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्या दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत. 1974 मध्ये, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना इतिहासातील सर्वाधिक रेकॉर्डिंग केलेल्या कलाकार म्हणून स्थान दिले. त्यांनी 1948 ते 1974 या काळात 25,000 हून अधिक गाणी गायली आहेत.

संबंधित बातम्या : 

Film Mahotsav : पहिल्या ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’त ‘खिसा’ सर्वोत्कृष्ट! ‘साईड मिरर’, ‘लगाम’ यांचाही गौरव!

फरहान अख्तर लग्नबेडीत अडकणार, मराठमोळी नवरी कोण? वाचा सविस्तर

(Lata Mangeshkar’s condition has not improved yet)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें