AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

32 वर्षे जुनं गाणं, ज्याला माधुरीने दिला नकार, पण दिग्दर्शकाने बळजबरी केलं शूट, रिलीज होताच ठरलं सुपरहिट

32 वर्षे जुनं गाणं, ज्याला माधुरी दीक्षितने करण्यास दिलेला नकार. मात्र, दिग्दर्शकाने बळजबरी केलं शूट. रिलीज होताच बनलं सुपरहिट. आजही त्या गाण्याचे लाखो चाहते.

32 वर्षे जुनं गाणं, ज्याला माधुरीने दिला नकार, पण दिग्दर्शकाने बळजबरी केलं शूट, रिलीज होताच ठरलं सुपरहिट
| Updated on: May 23, 2026 | 6:41 PM
Share

Madhuri Dixit : 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंजाम’ या चित्रपटातील ‘चने के खेत में’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्या अफलातून उपस्थितीमुळे हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र या सुपरहिट गाण्याबद्दल एक अत्यंत रंजक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. सुरुवातीला स्वतः माधुरी दीक्षित आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी हे गाणे नाकारले होते.

चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल रवैल आणि संगीतकार जोडी आनंद-मिलिंद यांनी ‘चने के खेत में’ हे गाणे चित्रपटात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गाण्याची धून ऐकल्यानंतर माधुरी दीक्षित आणि सरोज खान या दोघींनाही त्यावर डान्स कसा करायचा याबद्दल मोठा प्रश्न पडला.

माधुरीने दिलेला नकार

माधुरी दीक्षितने एका मुलाखतीत सांगितले होते की, हे गाणे ऐकल्यावर आम्हाला वाटले की यावर डान्स करणे शक्यच नाही. सरोज खान यांनाही या गाण्याची लय आणि शैली पारंपरिक डान्ससाठी योग्य वाटत नव्हती. त्यामुळे सुरुवातीला त्यांनीही हे गाणे कोरिओग्राफ करण्यास फारसा उत्साह दाखवला नव्हता.

मात्र दिग्दर्शक राहुल रवैल यांना त्यांच्या कल्पनेवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी माधुरी आणि सरोज खान यांना समजावून सांगितले की, या गाण्यात काहीतरी वेगळेपण आहे आणि योग्य पद्धतीने सादर केल्यास ते प्रेक्षकांच्या मनात घर करेल. अखेर त्यांच्या आग्रहानंतर या गाण्याचे शूटिंग करण्यात आले.

प्रदर्शित होताच देशभरात सुपरहिट

यानंतर सरोज खान यांनी आपल्या अप्रतिम कोरिओग्राफीने या गाण्याला एक वेगळीच उंची मिळवून दिली. माधुरी दीक्षितच्या नृत्यशैलीने आणि त्यांच्या निरागस, देसी अंदाजाने गाण्याला विशेष आकर्षण प्राप्त झाले. त्या काळात ग्लॅमरस डान्स नंबरचा ट्रेंड असताना, ‘चने के खेत में’मध्ये सादर झालेला साधा पण मोहक अंदाज प्रेक्षकांना प्रचंड भावला.

गाण्यात शाहरुख खानचा खोडकर आणि उत्साही अंदाजही विशेष चर्चेत राहिला. त्यामुळे हे गाणे चित्रपटातील सर्वात संस्मरणीय भाग ठरले. विशेष म्हणजे, चित्रपटात शाहरुख खानने खलनायकाची भूमिका साकारली असली तरी हे गाणे चित्रपटातील सर्वात सकारात्मक आणि आनंददायी क्षण मानले जाते. ‘चने के खेत में’ हे गाणे प्रदर्शित होताच देशभरात सुपरहिट झाले.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल