AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम बाप-लेकाची जोडी चित्रपटात एकत्र

नुकताच या चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रियुनियनच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या पण काही विचित्र गोष्टींमुळे कचाट्यात सापडलेल्या मित्रांची धमाल गोष्ट म्हणजे 'चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम बाप-लेकाची जोडी चित्रपटात एकत्र
Prasad Khandekar and his son ShlokImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 21, 2025 | 2:28 PM
Share

वडील-मुलाचं समीकरण हे नेहमीच मित्रत्वाचं असतं. लहानपणापासून प्रत्येक मुलासाठी वडील आदर्श असतात, हिरो असतात. वडिलांसारखंच कर्तृत्ववान होण्याची त्यांची इच्छा असते. चित्रपटसृष्टीत बाप-लेक एकत्रित झळकण्याची परंपरा आहे. या यादीत आणखी एका जोडीचा समावेश होणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद महादेव खांडेकर आणि त्यांचा मुलगा श्लोक खांडेकर आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्लोक खांडेकर अभिनयाचा ‘श्रीगणेशा’ करणार आहे.

इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या आठ वर्षांच्या श्लोकने अभिनयाच्या आवडीतून या चित्रपटातील जॉनी लिव्हर पाध्ये ही भूमिका साकारली आहे. त्याची मजेशीर व्यक्तिरेखा काय धमाल उडवणार, हे ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात पाहणं रंजक असणार आहे. गारठणाऱ्या थंडीत स्विमिंगपूलमध्ये शूट ते स्केटिंग वरचा सीन या सगळ्या गोष्टी श्लोकने अतिशय सफाईदारपणे केल्याने लेकाचा अभिमान तर आहेच, पण या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला एकत्र प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मिळतंय हे आमच्यासाठी आनंददायी असल्याचं प्रसाद खांडेकर सांगतात.

या चित्रपटात प्राजक्ता माळी, स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, प्रभाकर मोरे, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, ऐश्वर्या बडदे, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे या कलाकारांची फौज हास्याचे फवारे उडवत रंगत आणणार आहेत.

नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचं आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचं लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचं आहे. तर छायांकन गणेश उतेकर यांचं आहे. धमाल, मस्ती, हास्याचे कारंजे उडवत येत्या 28 फेब्रुवारीला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.