AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राची हास्यजत्रेला मोठा धक्का! लेखक विजय कुमार राख यांचं अपघाती निधन; सचिन गोस्वामी यांची भावूक पोस्ट

Maharashtrachi Hasya Jatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित ही माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी विजय कुमार यांच्या लेखनातील वैशिष्ट्यांचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रेला मोठा धक्का! लेखक विजय कुमार राख यांचं अपघाती निधन; सचिन गोस्वामी यांची भावूक पोस्ट
लेखक विजय राखImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 18, 2026 | 8:27 AM
Share

Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाच्या टीममधील लेखक विजय कुमार राख यांचं रात्री झालेल्या अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रासह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमवर आणि त्यांच्या मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. विजय कुमार हे विनोदाची उत्तम जाण असणारे आणि ग्रामीण जीवनातील बारकावे आपल्या लेखनातून टिपणारे होतकरू लेखक म्हणून ओळखले जात होते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विजय कुमार यांच्या निधनाची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी विजय कुमार यांच्या लेखनातील वैशिष्ट्यांचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सचिन गोस्वामी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘हास्यजत्रेच्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचं रात्री एका अपघातात निधन झालं.’ विजय कुमार हे विनोदाची उत्तम जाण असणारे लेखक होते. त्याचबरोबर ग्रामीण जीवनातील विविध पैलू आणि बारकावे हेरण्याची त्यांची खास नजर होती, असंही त्यांनी नमूद केलं. विजय कुमार यांनी आपल्या लेखनातून ग्रामीण जीवनातील प्रसंग, माणसांचे स्वभाव आणि त्यातील विनोदी पैलू प्रभावीपणे मांडले. विनोदनिर्मिती करताना केवळ हास्य निर्माण करण्यापेक्षा त्यामागील निरीक्षणशक्ती महत्त्वाची असते. विजय कुमार यांच्या लेखनात ही निरीक्षणशक्ती दिसून येत असल्याचं सचिन गोस्वामी यांच्या पोस्टवरून स्पष्ट होतं.

सचिन गोस्वामी यांची पोस्ट-

ऐन तारुण्यात विजय कुमार यांचं निधन झाल्याने त्यांच्या जवळच्या व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे. “ऐन तारुण्यात त्यांचं जाणं हे कलाक्षेत्र, हास्यजत्रा टीम आणि त्यांच्या मित्रपरिवारासाठी मोठा धक्का आहे,” असं सचिन गोस्वामी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. विजय कुमार यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचंही सचिन गोस्वामी यांनी म्हटलं आहे.

विजय कुमार यांच्या आकस्मिक निधनामुळे मनोरंजन क्षेत्रातील सहकारी, मित्र आणि चाहत्यांकडूनही दुःख व्यक्त केलं जात आहे. विनोदाची जाण आणि ग्रामीण जीवनाचे बारकावे हेरणारा एक होतकरू लेखक गमावल्याची भावना या घटनेनंतर व्यक्त होत आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...