AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमित शाह-एकनाथ शिंदे यांच्यात गुप्तगू, उद्धव सेनेला धडकी भरवणारी वार्ता, दिशा सालियान…

Amit Shah-Uddhav Thackeray Meeting: एक मोठी अपडेट समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गुजरातमध्ये अर्धा तास गुप्तगू झाल्याची बातमी समोर येत आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

मोठी बातमी! अमित शाह-एकनाथ शिंदे यांच्यात गुप्तगू, उद्धव सेनेला धडकी भरवणारी वार्ता, दिशा सालियान...
अमित शाह- उद्धव ठाकरे
| Updated on: Sep 18, 2026 | 8:50 AM
Share

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये मोठा कार्यक्रम झाला. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा सहभागी झाले. या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात कार्यक्रमानंतर काल गुजरातमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या सुरू असलेल्या सुनावणीबाबत आणि निधी वाटपाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे. यासोबतच सध्या राज्यात गाजत असलेल्या दिशा सालियान मृत्य प्रकरण आणि आदित्य ठाकरेंसह इतर विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात चर्चा

सध्या राज्यात दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. सीबीआयची एंट्री झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह इतरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी दिशा सालियान मृत्यू प्रकरणातील अदित्य ठाकरेंवरील आरोपाबबातही अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये १० मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे पडसाद राज्यातही उमटण्याची शक्यता आहे.

काळजी करू नका

सध्या सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष चिन्ह आणि मालकी यावर युक्तीवाद रंगला आहे. शिंदे सेनेच्या बाजूने युक्तीवाद सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूचा युक्तीवाद पूर्ण झालेला आहे. सुप्रीम कोर्टातील या घडामोडींवर शिंदे आणि शाहांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या चर्चेत अमित शाह यांना पुन्हा शिंदे यांना काळजी करू नका असा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याअगोदरही दोन्ही नेत्यांमध्ये अशी गुप्तगू झालेली आहे. त्यातून शिंदे यांना दिलासा मिळाला आहे. तर अमित शाह हे शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येते.

गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गुजरातमधील वडनगर येथे मोठा कार्यक्रम झाला. राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियानात एकनाथ शिंदे यांनी मोदींचे कौतुक केले. त्यांनी भाषणाची सुरुवात गुजराती भाषेतून केली. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. दरम्यान कालच्या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उपस्थित नव्हत्या. केवळ एकनाथ शिंदे हेच या कार्यक्रमाला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...