‘पीएम नरेंद्र मोदी’ फेम संदीप सिंह बनवणार ‘स्वातंत्रवीर सावरकरां’वर चित्रपट, महेश मांजरेकर सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा!

दिग्दर्शक महेश मांजरेकर गेल्या दीड दशकांपासून एकापाठोपाठ एक उत्कृष्ट चित्रपटांची मेजवानी चाहत्यांचा भेटीस घेऊन येत आहे. आता महेश मांजरेकर महान सेनानी ‘स्वातंत्रवीर सावरकरां’ची कथा सांगणार आहेत.

‘पीएम नरेंद्र मोदी’ फेम संदीप सिंह बनवणार ‘स्वातंत्रवीर सावरकरां’वर चित्रपट, महेश मांजरेकर सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा!
महेश मांजरेकर

मुंबई : दिग्दर्शक महेश मांजरेकर गेल्या दीड दशकांपासून एकापाठोपाठ एक उत्कृष्ट चित्रपटांची मेजवानी चाहत्यांचा भेटीस घेऊन येत आहे. आता महेश मांजरेकर महान सेनानी ‘स्वातंत्रवीर सावरकरां’ची कथा सांगणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक बनवणारे चित्रपट निर्माते संदीप सिंग यांनी ‘स्वतंत्रवीर सावरकर’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी महेश मांजरेकर (Mahesh manjrekar) यांची निवड केली आहे. संदीप हा मित्र अमित वाधवानी यांच्यासमवेत हा चित्रपट बनवणार आहे (Mahesh manjrekar announces his new movie Swatantraveer Savarkar).

28 मे 1883 रोजी जन्मलेल्या विनायक दामोदर सावरकरांची संघर्ष कथा सांगण्यासाठी महेश मांजरेकर बर्‍याच काळापासून संशोधन करत आहेत. संदीप सिंगने या कथेचे सर्व कायदेशीर हक्क संपादन केले आहेत. आता संदीप, महेश आणि अमित या तिघांनी देशाच्या या महान सुपुत्राची कहाणी मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

वास्तवातल्या कथांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांमुळे महेश मांजरेकर यांना मराठीसह, हिंदी चित्रपटसृष्टीतही बरीच प्रसिद्धी मिळवली. ‘वास्तव’, ‘अस्तित्व’ आणि ‘कुरुक्षेत्र’ सारख्या हिंदी चित्रपटांनंतर महेश मांजरेकर यांनी ‘काकस्पर्श’ आणि ‘नटसम्राट’ सारख्या मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

पाहा पोस्ट :

‘अंतिम’मध्ये व्यस्त महेश मांजरेकर

महेश मांजरेकर सध्या सलमान खान आणि त्याचा मेहुणा आयुष शर्मा यांच्यासमवेत ‘अंतिम’ हा चित्रपट बनवत आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘1962: द वॉर इन द हिल्स’ ही वेब सीरीजही यावर्षी रिलीज झाली होती. महेश मांजरेकर दिग्दर्शित करत असलेल्या ‘स्वतंत्रवीर सावरकर’ या चित्रपटाविषयी बोलताना निर्माता संदीप सिंह म्हणतात, ‘वीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि कृतज्ञतेचे सर्व पैलू आपल्याला माहित आहेत. त्यांची पूजा करणारे आणि टीका करणारे दोन्ही गट समाजात आहेत. त्यांच्याबद्दल अशा समजूती निर्माण झाल्या असाव्यात. परंतु, माझा विश्वास आहे की, वीर सावरकरांबद्दल अजूनही देशातील लोकांना जास्त माहिती नाही. आपल्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती, हे नाकारता येत नाही आणि या चित्रपटाच्या माध्यमातून आपण त्याच्या आयुष्यातील काही अस्सल पैलू लोकांपर्यंत पोहोचवू शकू, असा आमचा प्रयत्न असेल.’(Mahesh manjrekar announces his new movie Swatantraveer Savarkar)

हा चित्रपट आव्हान असेल : महेश मांजरेकर

चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकरांसाठी हा विषय सुरुवातीपासूनच त्याच्या हृदयाजवळचा होता. ते म्हणतात, ‘मी सुरुवातीपासूनच वीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व आणि काम पाहून प्रभावित झालो आहे. मला असे वाटते की, इतिहासाने त्यांना उचित स्थान दिले नाही. वीर सावरकरांचे नाव घेऊन लोकांनी ज्या प्रकारच्या भावना निर्माण केल्या त्या त्या गोष्टीचा पुरावा आहे. सावरकरांनी आपल्या आयुष्यात नक्कीच बर्‍याच लोकांना प्रभावित केले आहे. दिग्दर्शक म्हणून मला माहित आहे की, या चित्रपटाचे दिग्दर्शन करणे एक आव्हान असेल आणि मी ते स्वीकारण्यास तयार आहे.’

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे स्वातंत्रवीर सावरकर हिंदू महासभेचे सदस्य होते. 55 वर्षांपूर्वी 26 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. शुक्रवारी (28 मे) त्यांची 138वी जयंती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘स्वतंत्रवीर सावरकर’ चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्र आणि अंदमान बेट, तसेच लंडनमध्ये होणार आहे.

(Mahesh manjrekar announces his new movie Swatantraveer Savarkar)

हेही वाचा :

PHOTO | ‘लगीन घटिका समीप आली…करा हो लगीनघाई…’, पाहा डिंपल आणि ‘देवमाणसा’च्या लग्नसोहळ्याचे फोटो!

PHOTO | ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरी पतीसह नव्या माध्यमात झळकणार? पाहा सपनाचा जबरदस्त ‘कमबॅक’ प्लॅन

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI