घटस्फोटानंतर माहीने जय भानुशालीकडे मागितले इतके कोटी रुपये? पोटगीबद्दल स्पष्टच म्हणाली..
लग्नाच्या 14 वर्षांनंतर जय भानुशाली आणि माही विज यांचे मार्ग होत आहेत वेगळे.... माहीने घेतलीये नवऱ्याकडून पोटगी... काय आहे सत्य? अभिनेत्री पोटगीबद्दल स्पष्टच म्हणाली..

Bollywood Couple Divorce : झगमगत्या विश्वात एक चर्चा कायम रंगलेली असते आणि ती म्हणजे सेलिब्रिटींच्या घटस्फोटाची… गेल्या काही दिवसांपासून टीव्ही अभिनेता जय भानुशाली आणि अभिनेत्री माही विज यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. जय भानुशाली आणि माही विज यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सोशल मीडियावर देखील त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना अभिनेत्री मोठा खुलासा केला आहे.
पोटगीबद्दल स्पष्टच म्हणाली माही विज…
माही विज आणि जय भानुशाली यांच्या तुटणाऱ्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. माहीला 5 कोटी रुपये पोटगी मिळाल्याची माहिती देखील समोर येत आहे. पोटगीवर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली, “तुमच्याकडे पुरावे असतील तर बोला.”
‘पोटगीबद्दल मला काहीच कळत नाही… जर एक पुरुष पैस कमवत आहे, जेव्हा तुमचं नातं शेवटच्या टप्प्यावर असतं, तेव्हा त्याच्या पैशांवर एका महिलेचा हक्क नसू शकतो.. ही गोष्ट फक्त माझ्यासाठी नाही तर, समाजासाठी आहे… एक महिला म्हणून मी सांगत आहे.. मला असं वाटतं एक व्यक्ती स्वतःसाठी पैसे कमावतो…’
पुढे माही म्हणाली, ‘जर एखादा व्यक्ती स्वतःची काळजी स्वतः घेत असेल तर ती फार चांगली गोष्ट आहे… पोटगी फक्त त्या महिलांना मिळते, ज्यांनी कधी काम केलेलं नाही… महिला काम करण्यासाठी सक्षम आहेत… त्यांनी स्वतः मेहनत केली पाहिजे… वडील आणि नवऱ्याच्या कमाईवर अवलंबून राहणं योग्य नाही… त्याऐवजी, महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालं पाहिजं. ‘
अफवांवर विश्वस ठेऊ नका…
माही पुढे म्हणाली, ‘जेव्हा मार्ग वेगळे होतात, तेव्हा स्वतः कमवा.. एकत्र राहत असतानाही, प्रत्येक स्त्रीने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलं पाहिजं. तिच्या वडिलांच्या किंवा पतीच्या पैशावर अवलंबून नसावे. पोटगीबद्दल, माझ्याकडून ऐकल्याशिवाय कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नका.’
‘आपल्या गोपनीयतेचा, आमच्या मुलांच्या, आमच्या कुटुंबाच्या आणि पालकांच्या गोपनीयतेचा आदर करा. जर कधी कोणाला सांगण्याची गरज भासली तर आम्ही स्वतः ते नक्की सांगू. जय माझं कुटुंब आहे आणि कायम राहिल… तो माध्या मुलांचा बाप आहे… आणि एक चांगला व्यक्ती देखील आहे…’ असं देखील माही म्हणाली.
माही विज आणि जय भानुशाली यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांना एक मुलगी देखील आहे, जीचं नाव तारा असं आहे. सोशल मीडियावर दोघे मुलीसोबत कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.
