शाहरुख खानचा वाढदिवस म्हणजे भारतातील एक सण, ठाकरे गटातील नेता पोस्ट करत म्हणाला…
बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान आज 59 वा वाढदिवस साजरा करत आहे... अभिनेत्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या... ठाकरे गटातील नेते यांनी देखील पोस्ट करत अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत...

अभिनेता शाहरुख खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.. आज किंग खान याचा वाढदिवस आहे. म्हणून जगभरातील अभिनेत्याच्या असंख्य चाहत्यांनी शाहरुख खान याला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर देखील किंग खानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. किंग खान याला फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे.
मराठी अभिनेते आणि ठाकरे गटाने नेते किरण माने यांनी देखील खास अंदाजात किंग खान याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. किरण माने यांनी फेसबूकवर शाहरुख खान याचा फोटो पोस्ट करत अभिनेत्याचा वाढदिवस म्हणजे भरतातील एक सण… असं पोस्ट करत किरण माने म्हणाले आहे.
शाहरुख खान याचा फोटो पोस्ट करत किरण माने शुभेच्छा देत म्हणाले, ‘हॅपी बर्थडे सिनियर…आता भारतातला एक सण होऊन बसलाय तुझा वाढदिवस ! तुझे देख के हमने सिखा है… कितने भी दुख आए… कितने भी गम आए… कितनी ऊंचाई आए… कितनी भी नीचाई आए… आखिर में अच्छे लोग जरूर जितते है… लब्यू शारख्या…’ किरण माने यांच्या पोस्टवर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे…
शाहरुख खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, असंख्य हीट सिनेमे अभिनेत्या बॉलिवूडला दिले आहे. 90 च्या दशकात तर सर्वत्र फक्त आणि फक्त किंग खानचा बोलबाला होता. तो बोलबाला आज देखील कमी झालेला नाही. आजच्य Gen Z च्या काळात देखील शाहरुख प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे… ‘पठाण’, ‘जवान’, ‘डंकी’ सिनेमातून अभिनेत्याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर देखील मोठी मजल मारली. आजही चाहते शाहरुख खान याच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत असतात.
अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, किंग खान लवकरच ‘किंग’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्री सुहाना खान पहिल्यांदा वडिलांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सोशल मीडियावर देखील शाहरुख खान आणि सुहाना खान यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
