AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या चाळीशीत लग्नगाठ, घटस्फोट; 54 व्या वर्षी पुन्हा प्रेमात पडण्याची इच्छा; कोण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री?

बॉलिवूडमधील अशी एक ब्युटी क्विन जिचे चित्रपट तर तुफान चाललेच पण त्याहीपेक्षा जास्त तिच्या अफेअर्स आणि तिच्या लग्नाच्या चर्चा जास्त रंगल्या. एवढच नाही तर या अभिनेत्रीने चक्क 40 व्या वर्षी लग्नगाठ बांधली अन् दोनच वर्षात घटस्फोटही घेतला. अद्यापपर्यंत ती एकटीच आयुष्य जगत आहे. कोणा आहे ही बॉलिवूड अभिनेत्री.

वयाच्या चाळीशीत लग्नगाठ, घटस्फोट; 54 व्या वर्षी पुन्हा प्रेमात पडण्याची इच्छा; कोण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री?
| Updated on: Jan 12, 2025 | 7:10 PM
Share

बॉलिवूड म्हटलं की एक वेगळच जग आपल्या डोळ्यासमोर येतं. इथले बोल्ड-बिनधास्त जीवनशैली, गॉसिप या सर्व गोष्टी सामान्यांना नक्कीच रुचनाऱ्या आणि लवकर पचणाऱ्या नसतात. त्यामुळे बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्य, त्यांची नाती जास्त चर्चेचा भाग बनतात.

अशीच एक सेलिब्रिटी आहे जिला कोणत्याच ओळखीची आवश्यकता नाही. ही अभिनेत्री बॉलिवूडची लाडकी अन् प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जिने नाना पाटेकरपासून ते आमिर खानपर्यंत काम केलं आहे.

40 व्या वर्षी लग्न अन्…

एवढच नाही तर या अभिनेत्रीच्या चित्रपटांपेक्षा तिच्या अफेअरपासून ते लग्नापर्यंतच्या चर्चा जास्त झाली. या अभिनेत्रीने चक्क 40 व्या वर्षी लग्न केलं. ही अभिनेत्री म्हणजे ब्युटी क्विन मनीषा कोईराला. ‘हीरामंडी’ सीरिजमधून दमदार कमबॅक करणारी अभिनेत्री मनीषा कोईराला 90 चा काळ तिच्या चित्रपटांनी आणि तिच्या सौंदर्याने गाजवला. तिचे लाखोने चाहते आहेत.

2 वर्षातच घटस्फोट

मनीषा कोईरालाने वयाच्या चाळीशीत लग्न केलं. मनीषाने 2010 साली वयाच्या 40 व्या वर्षी बिजनेसमन सम्राट दहलसोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर 2 वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून आतापर्यंत ही अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत आहे.

मात्र मनीषाच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतार आले. तिला 2012 मध्ये कॅन्सरचं निदान झालं. पण त्यातून ती उपचार घेऊन बरी झाली आणि पुन्हा त्याच ताकदीने उभी राहिली आणि 2015 साली तिने ‘चेहरे’ मधून कमबॅक केलं.

View this post on Instagram

A post shared by Manisha Koirala (@m_koirala)

54 व्या वर्षी रिलेशनमध्ये येण्याची इच्छा

मनीषाने एका मुलाखतीत रिलेशनशिपवर चर्चा केली. ती आता 54 वर्षांची आहे. ती म्हणाली ” कोण म्हणालं माझ्याजवळ कोणीच नाही? हे बरोबर आणि चुकही आहे. कारण मी स्वत:ला चांगलं ओळखते. जर माझ्या आयुष्यात कोणी असलं तरी त्याच्यासाठी मी तडजोड करणार नाही. जर तो माझ्यासोबत पाऊल टाकत चालणार असेल तर मी आनंदी राहीन. पण मी जे आयुष्य उभं केलं आहे ते मी बदलणार नाही. माझ्या आयुष्यात कोणी येणार असेल तर येईलच. सध्या मी आयुष्य छान जगत आहे आणि पुढेही अशीच जगेन. मला माझ्या आवडीने स्वतंत्र जगायचं आहे.” असं म्हणत मनीषाने वयाच्या 54 व्या वर्षीसुद्धा रिलेशनमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली.

सध्या मनीषा ‘हीरामंडी’च्या दुसऱ्या भागाची शुटींग करत आहे. पहिल्या भागातील तिच्या अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.