मराठी सिनेविश्वात सेलिब्रिटींना नाही मिळत मानधन, प्रसिद्ध अभिनेत्याची संतप्त पोस्ट
Celebrity Life: 'काम करून पैसे मिळत नाहीत!' प्रसिद्ध अभिनेत्याने सोशल मीडियावर व्यक्त केला संताप, सांगितली झगमगत्या विश्वातील खरी परिस्थिती..., सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याची पोस्ट होत आहे तुफान व्हायरल...

झगमगत्या विश्वाचं आकर्षण अनेकांना असतं. झगमगत्या विश्वात काम करताना मिळणारी प्रसिद्धी, लोकप्रिया आणि मानधन यामुळे सेलिब्रिटी देखील चर्चेत असतात. पण अनेकदा सेलिब्रिटींना त्यांच्या कामाचं मानधन वेळेत मिळत नाही. असं अनेक सेलिब्रिटींसोबत झालं आहे. सांगायचं झालं तर मालिकांमध्ये काम करणाऱ्या सेलिब्रिटींना या अडचणीचा सामना अनेकदा करावा लागतो. शुटिंगला वेळेत पोहोचून, प्रामाणिकपणे काम केल्यानंतर देखील सेलिब्रिटींना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही. असाच एक प्रसंग एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यावर ओढावला आहे. ज्यावर अभिनेत्याने संताप देखील व्यक्त केला आहे.
सध्या ज्या अभिनेत्याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता आशय कुलकर्णी आहे. अभिनेत्याने एका मालिकेत काम केलं होतं. पण कामाचा मोबदला अभिनेत्याला मिळाला नाही. यासंदर्भात वारंवार फोन, ई-मेल करूनही उत्तर मिळत नसल्याचं आशयने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
आशय कुलकर्णी इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत म्हणाला, ‘मध्यंतरी मी एका मालिकेत काम केलं. मालिकेने नुकताच 800 भागांचा टप्पा पार केला. त्या शोचे प्रॉडक्शन मॅनेजर. अकाऊंट डिपार्टमेंट, त्या शोचे EP यांनी वारंवार फोन केले मेसेज कले, ई-मेल कले, तरी पैसे मिळत नाहीयेत…’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘आमच्याकडून रोज शूटला येण्याची अपेक्षा असते, तेही ‘वेळेत’ पण मग वेळेत पैसे देता का येत नाही???’ असा प्रश्न देखील अभिनेत्याने उपस्थित केला. अभिनेत्या सोशल मीडियावर मद्दा मांडल्यानंतर काही तासांत अभिनेत्याने आणखी एक पोस्ट केली.
इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो पोस्ट करत अभिनेता म्हणाला, ‘मिळाले!!!’ मझ्या सर्व मित्र – मैत्रिणी, हितचिंतक तुमच्या पाठिंब्यासाठी थँक यू… याचा अर्थ अभिनेत्याला त्याचे स्वतःचे पैसे मिळाले आहेत… सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

आशय कुलकर्णी याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘माझा होशील ना’, ‘पाहिले न मी तुला’ मुरांबा’ आणि ‘सुंदरी’ या मालिकांमध्ये आशय मुख्य भूमिकेत दिसला. आशय याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
आशय कुलकर्णी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर आशय चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. शिवाय 87.7K नेटकरी अभिनेत्याला फॉलो करतात. तर अभिनेता फक्त 696 नेटकऱ्यांना फॉलो करतो.
