AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : अंशुमन विचारेच्या स्वप्नातलं घर अखेर साकार, इंटिरियअरने वेधलं सर्वांचं लक्ष

Anshuman Vichare New Home : अभिनेता अंशुमान विचारे याने नव्या घराचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अत्यंत आलिशान आणि सुंदर अभिनेत्याचं घर दिसत आहे. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : अंशुमन विचारेच्या स्वप्नातलं घर अखेर साकार, इंटिरियअरने वेधलं सर्वांचं लक्ष
Anshuman Vichare
| Updated on: Sep 06, 2026 | 3:10 PM
Share

Anshuman Vichare New Home : अभिनेता अंशुमन विचारे याच्या घराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे प्रचंड सुंदर दिसत आहे. सांगायचं झालं तर, आपलं स्वतःचं हक्काचं घर असलं पाहिजे… असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण आजची महागाई पाहता ते शक्य होईल की नाही… असा विचार प्रत्येक जण करत असतो. एवढंच नाही तर, प्रॉपर्टीचे दर देखील दिवसागणिक वाढत आहे. अशात मुंबईत स्वतःचं घर घेणं फार कठीण आहे. बँकेचे हप्ते, कुटुंबियांची जबाबदारी, महागाई… अशा अनेक कारणांमुळे घर घेणं फार कठीण असते. पण मराठी सिनेविश्वातील अनेक सेलिब्रिटी नवीन घर घेत आहेत. सध्या अंशुमन विचारे याच्या घराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे…

अंशुमन याने पत्नी आणि मुलीसह नव्या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणतो, ‘देखो मैंने देखा है ये एक सपना… फुलों की शहर में है घर अपना…’, असं लिहिलं आहे. शिवाय या गाण्यावर डान्स देखील तिघांनी केला. व्हिडीओमध्ये अभिनेत्यासह पत्नी पल्लवी आणि लेक आनंदी दिसत आहेत. अभिनेत्याच्या घराचा हॉल प्रचंड मोठा आहे. अंशुमन याने घराला पांढरा रंग दिला, मुलीचा बेडरुम देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर किचन देखील सुंदर दिसत आहे.

अभिनेत्याची पत्नी पल्लवी यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत पल्लवी म्हणते, ‘आम्ही एकेकाळी हे स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न आता पूर्ण झालं आहे… आमचं स्वतःचं घर, इथली प्रत्येक जागा.. आमच्यासाठी स्पेशल आहे… आमच्या या नव्या घरात तुमचं स्वागत आहे…’, असं देखील पोस्ट लिहिण्यात आलं आहे.

सांगायचं झालं तर, याआधी अंशुमान याने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर गुडन्यूज दिलेली. ‘आजच्या दिवशी आमच्या आयुष्यातील हे तिसरं घर आहे..’, असं कॅप्शनमध्ये लिहिलं होत… यानंतर अभिनेत्याने घराच्या इंटिरियरचं काम करण्यास सुरुवात केली. आता काम पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्याने स्वप्नातलं घर अखेर साकार झाल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Follow Us
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली
राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
Raj Thackeray UNCUT Speech | राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी रावणाचा किस्सा सांगताच...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी किस्सा सांगिताच हशा पिकला, मेळाव्यातील लोकं...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले, न्यायप्रक्रियेतील गती...