VIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला

कॉल मेसेज तर कधीच कुणाचा मिस करु नका, अशी कळकळीची विनंती पुष्कर जोगने केली. (Pushkar Jog cries remembering Uncle)

VIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला
Pushkar Jog cries remembering Uncle
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 10:47 AM

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याच्या मामांचे नुकतेच निधन झाले. मामाचा फोन उचलू शकलो नाही, त्याला कॉल बॅक करायचा राहिला, आणि दुसऱ्याच दिवशी मामा सोडून गेल्याची दुःखद बातमी आली, असं सांगताना पुष्कर जोग हळवा झाला. या कठीण काळात प्रियजनांच्या संपर्कात राहा, असं आवाहन पुष्करने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना केलं. (Marathi Actor Pushkar Jog cries remembering Mama on Instagram Live reel video while telling sudden death of Uncle)

“हा काळ आपल्या सर्वांसाठी प्रचंड कठीण आहे, तेव्हा हेवेदावे, रुसवे फुगवे, वैचारिक मतभेद सर्व काही प्लिज प्लिज बाजूला ठेवा आणि आपल्या नातेवाईक, मित्र परिवार आणि आप्त स्वकीयांसह संपर्कात रहा. कॉल मेसेज तर कधीच कुणाचा मिस करू नका” अशी  कळकळीची विनंती पुष्करने केली.

काय म्हणाला पुष्कर जोग?

“13 एप्रिल म्हणजे पाडव्याच्या दिवशी मला माझ्या गोव्याच्या मामाचा फोन आला. मला म्हणाला कसा आहेस, मुंबईची परिस्थिती कशी आहे, काळजी घे. नुकतीच माझी एक फिल्म रिलीज झाली होती. मी त्याला विचारलं, मामा माझा सिनेमा कधी बघणार आहेस? तो म्हणाला माझ्याकडे ओटीटी चॅनेल नाहीये, मी म्हटलं हरकत नाही मामा, दोन-तीन महिन्यांनंतर चॅनेलवर फिल्म येईल, तेव्हा तू बघ” असं फोनवरील संभाषण पुष्करने सांगितलं

“गोव्याचा सतीशमामा गेला”

“त्यानंतर 21 एप्रिलला सकाळी 8 वाजता मामाचा मला परत फोन आला. मला लवकर उठायची सवय नसल्यामुळे मी त्याचा फोन उचलू शकलो नाही. त्याच दिवशी त्याला कॉल बॅक करणं राहून गेलं. 22 एप्रिलला, म्हणजे त्याच्याच दुसऱ्या दिवशी मला माझ्या कुटुंबाकडून समजलं की गोव्याचा सतीशमामा गेला.” असं सांगतानाच पुष्करला अश्रू अनावर झाले.

“खूप वाईट वाटलं, मी त्याचा फोन का नाही उचलला. आपण नेहमी, आपल्या मित्र-नातेवाईकांचा फोन येतो, तेव्हा म्हणतो, जाऊदे नंतर करु. असं नका करु, आता मिस्ड कॉल नको, कॉल बॅक करा, त्यांना विचारा, कसे आहात, सगळं व्यवस्थित आहे ना, त्यांना सांगा आम्ही आहोत.” असं आवाहन पुष्करने चाहत्यांना केलं.

“आपली माणसं न सांगताच सोडून चालली”

“हल्ली कोरोनामुळे इतकी भीती निर्माण झाली आहे, की आपली माणसं न सांगताच सोडून चालली आहेत. त्यांना फोन करा, कठीण काळात एकमेकांसोबत असल्याचं सांगा. आपण सगळे एकत्र राहूया, एकमेकांना मदत करुया, कृपा करुन कोणाशी वाईट वागू नका, सगळ्यांशी चांगले राहा” असंही पुष्कर म्हणाला. (Pushkar Jog cries remembering Uncle)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | लोक म्हणायचे, तू देवाचं करतेस, तुझ्या मुलीच्या आयुष्यात असं का व्हावं? तेजश्री प्रधानच्या आईचं मन जिंकणारं उत्तर

VIDEO | ‘येऊ कशी तशी…’च्या सेटवर ‘शकू’साठी पत्र, शुभांगी गोखलेंसह सगळ्यांच्या डोळ्याला धार

(Marathi Actor Pushkar Jog cries remembering Mama on Instagram Live reel video while telling sudden death of Uncle)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.