VIDEO | लोक म्हणायचे, तू देवाचं करतेस, तुझ्या मुलीच्या आयुष्यात असं का व्हावं? तेजश्री प्रधानच्या आईचं मन जिंकणारं उत्तर

आपल्या आईने दिलेली शिकवण कठीण काळात कशी उपयुक्त ठरली, हे तेजश्री या व्हिडीओमध्ये सांगताना दिसते. (Tejashree Pradhan Mothers Reaction personal life)

VIDEO | लोक म्हणायचे, तू देवाचं करतेस, तुझ्या मुलीच्या आयुष्यात असं का व्हावं? तेजश्री प्रधानच्या आईचं मन जिंकणारं उत्तर
Marathi Actress Tejashree Pradhan
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 3:30 PM

मुंबई : ‘अग्गंबाई सासूबाई’, ‘होणार सून मी ह्या घरची’ यासारख्या मालिकांमधून अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. छोट्या पडद्यासोबतच रंगभूमी, मराठी चित्रपट आणि बॉलिवूडमध्येही तेजश्री प्रधानने धडक मारली आहे. मात्र एकीकडे व्यावसायिक आयुष्य बहरत असताना तिच्या खासगी आयुष्यात त्रासदायक टप्पा आला होता. तेजश्रीला तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल थेट विचारणं टाळलं जातं, मात्र काही दिवसांपूर्वी तेजश्रीनेच मोकळेपणाने त्या विषयावर संवाद साधला होता. आपल्या आईने या काळात कशी खंबीर साथ दिली, हे तेजश्रीने सांगितलं. (Marathi Actress Tejashree Pradhan tells her Mothers Reaction when relatives asked about personal life)

तेजश्री प्रधान फॅन क्लब (tejashripradhanfc) या इन्स्टाग्राम अकाऊण्टवर तेजश्रीचा एक जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तेजश्रीने दिलेला एक सकारात्मक संदेश इंटरनॅशनल मदर्स डेच्या निमित्ताने पुन्हा शेअर करण्यात आला आहे. आपल्या आईने दिलेली शिकवण कठीण काळात कशी उपयुक्त ठरली, हे तेजश्री या व्हिडीओमध्ये सांगताना दिसते. हा पॉझिटिव्ह मेसेज कोणालाही आव्हानात्मक काळात उभारी देऊ शकतो.

काय म्हणाली तेजश्री?

“आता आम्ही सेलिब्रिटी आहोत, आम्हा कोणाचीच आयुष्य लपलेली नाहीत. माझं आयुष्यही तुम्हा कोणापासूनच लपलेलं नाही. माझ्या आयुष्यात जेव्हा टफ फेज आली, तेव्हा कित्येक नातेवाईकांनी माझ्या आईला असं सांगितलं, काय गं, तू तर इतकं देवाचं करतेस, तुझ्या मुलीच्या आयुष्यात असं का व्हावं? पण त्यावेळी माझ्या आईचं एक ठाम मत होतं, ते मी इतकं धरुन ठेवलं आहे. ते मला आयुष्यभर पुरणार आहे.” असं तेजश्री या व्हिडीओत सांगते.

“माझी आई त्यावेळी खूप संयमाने माझ्या काही नातेवाईकांना म्हणाली होती, की तिच्या आयुष्यात जे होतंय, किंवा जे झालंय, ते तिचं प्राक्तन आहे. ते बदलता नाही येणार. आणि माझं दैवत काय किंवा कुठलाच देव काय, जमिनीवर येऊन चल तुझं प्राक्तन बदलतो, असं म्हणू नाही शकत. पण तिच्या आयुष्यात, तिच्या वाट्याला जे लिहिलं गेलंय, ते फेस करण्याची ताकद तिच्यात यावी, हे मी देवाकडे मागते.” असं आईने सांगितल्याचं तेजश्री प्रधानने या व्हिडीओत सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ :

(Tejashree Pradhan Mothers Reaction personal life)
View this post on Instagram

A post shared by Tejashri Pradhan Fan Club™ (@tejashripradhanfc)

संबंधित बातम्या :

प्रेक्षकांना येतेय जुन्या ‘शुभ्रा’ची आठवण, ‘या’ कारणामुळे तेजश्रीने मालिकेला म्हटला गुडबाय!

‘होणार सून मी..’ आधी तब्बल तीन मालिका, बॉलिवूड डेब्यूमध्येच किसिंग सीन, लाडकी सून तेजश्री प्रधानचा प्रवास

(Marathi Actress Tejashree Pradhan tells her Mothers Reaction when relatives asked about personal life)

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.