AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prajakta Mali: प्राजक्ता माळीची लक्षवेधी पोस्ट, ‘त्या व्यक्तीसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर…’

Prajakta Mali on Breakup: 'त्या व्यक्तीसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर...', खासगी आयुष्याबद्दल प्राजक्ता माळीची पोस्ट, म्हणाली, 'या गोष्टीला 6 वर्ष झाली...', प्राजक्ता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

Prajakta Mali: प्राजक्ता माळीची लक्षवेधी पोस्ट, 'त्या व्यक्तीसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर...'
| Updated on: Dec 09, 2024 | 10:02 AM
Share

Prajakta Mali on Breakup: अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता ‘फुलवंती’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा 50 हून अधिक दिवस थिएटरमध्ये होता एवढंच नाही तर, निर्मिती म्हणून देखील प्राजक्ताचा ‘फुलवंती’ पहिलाच प्रयत्न होता आणि अभिनेत्रीचा पहिला प्रयत्न देखील यशस्वी ठरला आहे. आता प्राजक्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे.

नुकताच प्राजक्ता हिने सोशल मीडियावर आस्क मी एनिथिंग सेशन होस्ट केला. . ज्यामध्ये ती म्हणाली, ‘चला आज पहिल्यांदाच अशाप्रकारे गप्पा मारूया. तुमचे प्रश्न विचारा.’ यावेळी प्राजक्ताने चाहत्यांची प्रत्येक प्रश्नांची उत्तर दिली. शिवाय अभिनेत्रीने तिच्या ब्रेकअपबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

प्रश्न उत्तरांच्या खेळात एका चाहत्यांने अभिनेत्रीला विचारलं, ‘तू आर्ट ऑफ लिव्हिंगशी कधीपासून जोडली गेली आहेस? आर्ट ऑफ लिव्हिंगशी तू कशामुळे जोडली गेलीस?’ चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्रीने तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं आहे.

प्राजक्ता म्हणाली, ‘या गोष्टीला 6 वर्षे झाली आहेत… एका व्यक्तीसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे मला हे करण्यास मला भाग पाडलं… यामुळे मी स्वतःला परत मिळाले. त्यानंतर ही एक सवय झालं… त्यानंतर जीवनशैली, नित्यनियमाने करण्याची गोष्ट, ताकद झाली. आता ही गोष्ट “सिद्धी” झाली आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

काय आहे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’?

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ ही एक संस्था आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ ही एक संस्था श्री श्री रविशंकर यांनी स्थापन केलेला एक NGO आहे. या NGO मध्ये श्वास तंत्र, ध्यान आणि योगावर आधारित अनेक सत्रांचे आयोजन केलं जातं. प्राजक्ता कायम तेथील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

प्राजक्ता कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी