मुंबई : छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री वर्षा दांदळेंचा अपघात झाला आहे. अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. वर्षा दांदळे यांनी स्वत: त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. याच पोस्टमध्ये त्यांनी चाहत्यांना एक भावनिक आवाहनही केले आहे.
अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या अपघाताची माहिती देत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “मोठा अपघात. मनक्याला दुखापत झालीये. उजव्या पायालाही दुखापत झालीये, तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेची गरज आहे”.
वर्षा दांदळे नुकत्याच ‘पाहिले नं मी तुला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेत वर्षा दांदळेंनी साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. मालिकेत त्यांनी ‘वच्छि आत्या’चे पात्र साकारले होते.
पाहा वर्षा दांदळे यांची इन्स्टाग्राम पोस्ट –
View this post on Instagram
संबंधित बातम्या :
ऋतुराज गायकवाडची दमदार खेळी, मैदानीतील धुव्वेबाजी पाहून चाहत्यांना आली मराठी अभिनेत्रीची आठवण!
निळ्या रंगाची नवलाई अन् खट्याळ हसू, नऊवारी साजात शोभून दिसतेय अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी!