AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी सोडवणार ‘केस नंबर 002’, रसिकांना अनुभवता येणार थरार!

लेखिका सायली केदार यांच्या ‘केस नंबर 001’ च्या पहिल्या सिझनला मिळालेल्या प्रचंड यशानंतर या मालिकेचा दुसरा सिझन प्रख्यात अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्या आवाजात स्टोरीटेल मराठीवर प्रदर्शित होत आहे.

अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी सोडवणार ‘केस नंबर 002’, रसिकांना अनुभवता येणार थरार!
Case Number 002
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 9:27 AM
Share

मुंबई : स्टोरीटेलवर दिग्गज साहित्यिकांसोबतच नव्या दमाच्या प्रतिभावंतांनाही विशेष स्थान दिले जात आहे. आपल्या मातृभाषेतील नवनवे साहित्य ऑडिओबुक्सद्वारे सातत्याने  स्टोरीटेलवर निर्माण होत असून रसिकांचा प्रतिसादही अभूतपूर्व असा मिळत आहे. लेखिका सायली केदार यांच्या ‘केस नंबर 001’ च्या पहिल्या सिझनला मिळालेल्या प्रचंड यशानंतर या मालिकेचा दुसरा सिझन प्रख्यात अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्या आवाजात स्टोरीटेल मराठीवर प्रदर्शित होत आहे.

‘केस नंबर 002’ विषयी लेखिका सायली केदार सांगतात, “केस नंबरचा पहिला सिझन लिहिताना त्यावर मी आणि माझ्या पब्लिशर सई तांबेनी बरंच काम केलं होतं. श्रोत्यांना कसं खिळवून ठेवता येईल, हे प्रत्येक एपिसोडमध्ये काटेकोरपणे बघत होतो. सिरीज रिलीज झाली, तेव्हा आम्ही केलेल्या कामाबद्दल समाधानी होतो पण कसा रीस्पाँस येईल याबद्दल खूप उत्सुकता होती. मात्र सिरीज भरपूर तास ऐकली गेली आणि प्रतिक्रियांचा, मेसेजेचा आणि ईमेलचा पाऊस पडला. लोकांना ती गोष्ट खूपच आवडली आणि ती अगदी अनपेक्षितपणे बराच काळ best sellers मध्ये झळकली.”

दुसरा सिझन लिहिताना अपेक्षा वाढल्या!

“अर्थातच दुसरा सिझन लिहीताना माझ्या स्वतःकडून आणि लोकांच्या या सिरीजकडून, त्या पात्रांकडून बऱ्याच अपेक्षा होत्या आणि आहेत. मुख्य पात्र इन्सपेक्टर निरंजन प्रभु हेच असल्याने आणि त्याची तपासाची, कामाची पद्धत तीच असल्याने थोडी पार्श्वभूमीसुद्धा सिझन 2 मध्ये आहे. स्टोरीटेलच्या टीमबरोबर काम करणं ही खूपच समाधानाची गोष्ट होती. आम्हाला काम करताना जशी मजा आली तशीच श्रोत्यांनाही ऐकताना मजा यावी येईल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गीतांजली कुलकर्णी यांनी या सीरीजला आवाज दिला आहे, त्यांच्या या अनुभवाबद्दल त्या म्हणाल्या ‘केस नंबर 002’ चा अनुभव यासाठी चांगला होता कारण की, सई आणि सायली दोघीही खूप मन लावून काम करतात. आम्ही एकत्र मिळून खूप चर्चा केल्या, त्या खूप इनपुट्स देतात, त्यामुळे असं नाही वाटत कि, तिथे आपण फक्त आहोत. आपल्याला मदत करायला खूप लोकं असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींकडेसुद्धा लक्ष देतात. हे पात्र तसंच साउंड नाही ना होत आहे, वेगळं वाटतंय ना? तर त्यामुळे काम करताना जे सुरुवातीला अस्पेशिअली गरज असते. कि आपल्याला एक्झॅक्टली पात्राचा आवाज त्याच्या टेम्प्रामेंटप्रमाणे त्याचं बोलणं ठरवायचं असतं. तेव्हा मदत झाली खूप सईची आणि सायलीची. आणि नंतर अर्थातच तुम्हाला अंदाज येतो आणि मग तुम्ही फाईंडआऊट करता कि कसं असेल हे पात्र आणि तुम्ही करत जाता. हे एक टीम वर्क आहे. केस नंबर 002 मधील थरार, भीती, प्रेम प्रसंग, असे अनेक प्रसंग आणि त्यातील भाव रेकॉर्ड करताना मला फार मजा आली. ऑडिओबुक रेकॉर्डिंगची प्रोसेसच मला मेडिटेटिंग वाटते.

काय आहे नेमकी कथा?

‘केस नंबर 002’ या सीरिजमध्ये निरंजन प्रभू हा एक साधा अप्पर मिडला क्लास, सर्वसामान्य माणसू. अर्थार्जनासाठी आणि आवड यासाठी प्रत्येकच माणसू काही न काही काम करत असतो. तसंच निरंजन त्याच्या पॅशनसाठी पोलिस खात्यात आला. पण वर्दी म्हणजे कणखर आणि तटस्थ असा ग्रह आणि अपेक्षा असली तरीही माणसू म्हटलं की भावना आल्या, कुटुंब आली. दोन्ही बाजू सांभाळणं आलं. पण घरच्या जबाबदाऱ्यांना ओझं न मानता त्यांचा केस समजनू घेण्यासाठी उपयोग करणाऱ्या निरंजनकडे एका रात्री एक माणसू बायकोची मिसिगं कंप्लेंट घेऊन येतो.

बायको गायब होऊन काहीच तास व्हायच्या आत, तिची वाट बघण्याआधी याला ती गायब झाल्याची खात्री आहे. निरंजन त्या सणकी नवऱ्याची केस घेतो आणि त्याच्या बायकोचा, अपर्णाचा मृत्यू होतो. या केस नंबर 002 चा तपास करताना निरंजनला नेमकं कोणतं सत्य कळतं? एकामागून एक संशयित आणि साक्षीदार संपत जाताना ही केस सोडविण्यात निरंजन यशस्वी होतो का? पहिल्याच केसच्या यशानंतर वाढलेल्या अपेक्षा पुऱ्या करताना निरंजनची होणारी तारेवरची कसरत आणि गुन्हेगाराची हाताबाहेरची सूडवृत्ती दाखवणारी ही  रहस्यमय ‘केस नंबर 002’ अनेक गुपितांसोबत रसिकांची उत्कंठा ताणत त्यांना सहज गुंतवरून सोडते.

हेही वाचा :

‘बाबू’मध्ये नेहा महाजनची एंट्री, लॉकडाऊननंतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार मराठीत ॲक्शनचा तडका!

Dating Advice | डेटिंगबद्दल सारा अली खानला आई अमृताने दिला होता सल्ला, म्हणाली ‘रिलेशनशिपमध्ये आल्यावर…’

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...