AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रहमाननं 25 गायिकांना ऐकलं पण मग बेलालाच का निवडलं? ऐका, बघा हा Video

म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान बेला शेंडेला मंचावर आमंत्रित करण्यात आले. यावेळी चक्क रहमान यांनी बेलाची ओळख करून दिली. इतकेच नव्हे तर तिची या गाण्यासाठी कशी निवड झाली, हे सांगत तिचे कौतुक देखील केले.

रहमाननं 25 गायिकांना ऐकलं पण मग बेलालाच का निवडलं? ऐका, बघा हा Video
ए.आर.रहमान आणि बेला शेंडे
| Updated on: Apr 24, 2021 | 10:47 AM
Share

मुंबई : मनोरंजन विश्वातले सर्वात सुप्रसिद्ध गायक-संगीतकार ‘मोझार्ट ऑफ मद्रास’ अर्थात ए.आर. रहमान (AR Rahman). आपल्या जादुई आवाजाने आणि संगीताने श्रोत्यांना आणि समस्त जगाला मंत्रमुग्ध करतात. नुकताच त्यांचा ’99 साँग्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या निमित्ताने त्यांनी गाण्यांची एक म्युझिक कॉन्सर्ट देखील त्यांनी आयोजित केली होती. रहमान यांच्या या ‘#99songsconcert’मध्ये गाण्याची संधी मिळाली ती मराठीमोळी गायिका बेला शेंडे (Bela Shende) यांना…(AR Rahman revel why he choose Bela Shende for sai song after hearing 25 voices)

अनेक आवाज ऐकले पण तुझा आवाज योग्य वाटला!

या म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान बेला शेंडेला मंचावर आमंत्रित करण्यात आले. यावेळी चक्क रहमान यांनी बेलाची ओळख करून दिली. इतकेच नव्हे तर तिची या गाण्यासाठी कशी निवड झाली, हे सांगत तिचे कौतुक देखील केले. ते म्हणाले, आम्ही या गाण्याची म्युझिक तयार केली होती. अनेक दिवस बसून आम्ही या संगीतावर जवळपास 25 गायिकांचे आवाज ऐकले…पण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा तुमचा आवाज यायचा, तेव्हाच ते गाणे ऐकावेसे वाटायचे. मग, आम्ही ठरवलं की हाच आवाज या गाण्यासाठी योग्य आहे.

बेलाने मानले आभार…

रहमान यांच्या या कौतुकाने भारावून गेलेल्या बेलाने त्यांचे आभार मानले. हे गाणे ‘साई बाबां’शी संबंधित होते. बेला म्हणते, ‘ही सेवा होती.. मी त्याच्या केवळ दुवा ठरले. हे गाणे गात असताना खूप वेगळी अनुभूती येते. तुम्ही या गाण्यासाठी माझी निवड केलीत. मी खूप खूप आभारी आहे तुमची!’

पाहा व्हिडीओ

 (AR Rahman revel why he choose Bela Shende for sai song after hearing 25 voices)

बेला शेंडेची ओळख

बेला शेंडेची गणना अशा गायिकांमध्ये होते, ज्यांच्या गायनासोबत त्यांच्या लुक्सचीही फार चर्चा असते. बेला शेंडे ही नेहमीच साडी अथवा ड्रेसमध्येच प्रेक्षकांसमोर येते. तिचे हे साधे आणि लोभस रुप प्रेक्षकांना फार आवडते. सालस चेहऱ्याची बेला जितकी सुंदर गाते, तितकीच तिच्या सालस रुपाने प्रेक्षकांना आपलेसे करते.

बेलाचे वडील संजीव शेंडे डॉक्टर आहेत. तर, तिची आजी कुसुम शेंडे या प्रख्यात गायिका आहेत. तसेच बेलाची मोठी बहीण सावनी शेंडेही गायिका आहे. बेलाने वयाच्या 16व्या वर्षी ‘झी सारेगमप’ या शोमध्ये भाग घेतला होता. ‘कैसा ये जादू’ या अल्बमने तिच्या करिअरची सुरुवात झाली होती. त्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये ‘तेरा मेरा साथ रहे’ या गाण्याने ब्रेक मिळाला. त्यानंतर राणी मुखर्जीच्या ‘पहेली’ या चित्रपटात तिला गाण्याची संधी मिळाली आणि राणी मुखर्जीसाठी तिने हे गाणे शूट केले. आशुतोष गोवारीकर यांच्या ‘जोधा अकबर’ या चित्रपटासाठीही तिने गाणे गायले.

बेलाने ‘वाजले की बारा’ (नटरंग), ‘सु छे’ (व्हॉट्स युअऱ राशी), ‘अप्सरा आली’ (नटरंग) यासारख्या लोकप्रिय गाण्यांना आपल्या आवाजाच साज चढवला आहे. 2014 साली बेलाला मराठी चित्रपट ‘तुह्या धर्म कोणचा’ या मराठी चित्रपटातील ‘खुरखुरा’ या गाण्यासाठी ‘बेस्ट प्लेबॅक सिंगर’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

(AR Rahman revel why he choose Bela Shende for sai song after hearing 25 voices)

हेही वाचा :

Video | नारंगी साडीतील शालूचा काळ्या रानात जलवा; चाहते म्हणतायत ‘हळू चाल काटा रुतेल गं…’

दिवसा शाळा, रात्री गायनपार्ट्या, लतादीदींनीही कौतुक केलेली ही गायिका माहीत आहे का?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.