AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sher Shivraj: ‘शेर शिवराज’मध्ये घडणार शिवरायांच्या अद्भुत गुणांचं, अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन

प्रतापगड (Pratapgad).. नुसते नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर उभी राहते महाराजांची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा. ‘प्रतापगड रणसंग्राम’ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युध्दशास्त्राने दिलेलं एक अजोड देणं.

Sher Shivraj: 'शेर शिवराज'मध्ये घडणार शिवरायांच्या अद्भुत गुणांचं, अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन
Sher ShivrajImage Credit source: Tv9
| Updated on: Apr 20, 2022 | 7:45 AM
Share

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नाला नेस्तनाबूत करण्याच्या गर्जना करीत एक महाभयंकर झंझावात प्रचंड शक्तिनिशी स्वराज्यावर चालून आला. त्याच्या समशेरीचा दरारा असा होता की सारी दख्खन त्याच्या धाकाने थरकापत होती. त्याच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला, त्यावेळी त्या दैत्याचा बंदोबस्त करण्यासाठी, अन्याय निवारण्यासाठी कणाकणांतून बाहेर पडला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह.. ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj). प्रतापगड (Pratapgad).. नुसते नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर उभी राहते महाराजांची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा. ‘प्रतापगड रणसंग्राम’ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युध्दशास्त्राने दिलेलं एक अजोड देणं. तुटपुंज्या आयुधाने आणि कमीत कमी सेनेच्या साथीने, आपल्यापेक्षा तीनचार पटीने बलाढय असणाऱ्या शत्रूशी मुकाबला करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठया कौशल्याने प्रचंड विजय मिळविला. त्यांच्या या गनिमी युध्दनीतीला आणि शौर्याला उभ्या जगात तोड नाही. हाच दैदिप्यमान इतिहास ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या रुपाने येत्या शुक्रवारी 22 एप्रिल रोजी चित्रपटगृहात अनुभवायला मिळणार आहे. (Marathi Movie)

‘शेर शिवराज’ चित्रपटाची निर्मिती मुंबई मुव्ही स्डुडिओजचे नितीन केणी, राजवारसा प्रॉडक्शनचे प्रद्योत पेंढरकर व अनिल नारायणराव वरखडे, तसेच मुळाक्षरचे दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांची आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड चित्रपटांच्या यशानंतर लेखक–दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा शिवराज अष्टकातील ‘शेर शिवराज’ हा चौथा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवरायांच्या अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन ‘शेर शिवराज’ या चित्रपटात घडणार आहे. यासोबतच त्या काळातील सामाजिक, राजकीय वातावरण, राजांच्या अचूक निर्णयांचा रयतेला होणारा फायदा, शत्रूंची आक्रमणं परतवून लावण्याची शक्ती, अफझलखानाची स्वारी, खानाचा वध करत विजापूरी साम्राज्याला राजांनी लावलेला सुरुंग आणि त्यामुळं हादरलेल्या आदिलशाहीचं यथोचित चित्रण ‘शेर शिवराज’ मध्ये दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे.

कोणते कलाकार साकारणार कोणत्या भूमिका?

‘शेर शिवराज’ चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज तर बलाढ्य अफजलखानाच्या रुपात प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते मुकेश ऋषी दिसणार आहेत. तर इतर व्यक्तिरेखांमध्ये मृणाल कुलकर्णी जिजाऊ आऊसाहेब, अजय पूरकर सुभेदार तानाजी मालुसरे, दिग्पाल लांजेकर बहिर्जी नाईक, वर्षा उसगांवकर बडी बेगम, समीर धर्माधिकारी कान्होजी जेधे, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे केसरच्या भूमिकेत तर अक्षय वाघमारे पिलाजी गोळे, विक्रम गायकवाड सरनोबत नेताजी पालकर, आस्ताद काळे विश्वास दिघे, वैभव मांगले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील गोपीनाथ बोकील, सुश्रुत मंकणी येसाजी कंक, दीप्ती केतकर मातोश्री दिपाईआऊ बांदल, माधवी निमकर मातोश्री सोयराबाई राणीसरकार, ईशा केसकर मातोश्री सईबाई राणीसरकार, रिशी सक्सेना फाझल खानची तर निखील लांजेकर नरवीर जीवा महाले, बिपीन सुर्वे सर्जेराव जेधे यांची भूमिका साकारणार आहे.

चित्रपटाचे छायांकन रेशमी सरकार तर संकलन विनोद राजे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज यांचे आहे. सानिका गाडगीळ रंगभूषा तर पौर्णिमा ओक यांनी वेशभूषेची जबाबदारी साभांळली आहे. शुभंकर सोनाडकर यांनी व्हीएफएक्स तर निखील लांजेकर आणि हिमांशु आंबेकर एसएफएक्सची धुरा सांभाळली आहे. वैभव गलांडे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक तर असोसिएट दिग्दर्शक सुश्रूत मंकणी आहेत. बब्बू खन्ना यांनी अॅक्शनची जबाबदारी साभांळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर यांचे आहे.

हेही वाचा:

Ranbir Alia Net Worth: साधेपणानं लग्न पण रणबीर-आलियाच्या संपत्तीचा आकडा ऐकून डोळे विस्फारतील!

Jayeshbhai Jordaar trailer: दमदार कथेला कॉमेडीचा तडका; रणवीरच्या ‘जयेशभाई जोरदार’चा ट्रेलर पाहिलात का?

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.