Video | कोरोना लसीकरणादरम्यान हजार नखरे, ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!

'मराठी बिग बॉस’ फेम अभिनेत्री हीना पांचाळ (Heena Panchal) हिने देखील लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, या दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताच हीना खूप ट्रोल झाली आहे.

Video | कोरोना लसीकरणादरम्यान हजार नखरे, ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!
हीना पांचाळ

मुंबई : सध्या देशभरात कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे. दररोज हजारो लोक या विषाणूला बळी पडत आहेत. तर, लाखो लोक या महाभयंकर विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत. अशातच देशात कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण मोहीम (corona vaccination) देखील वेगाने सुरु करण्यात आली आहे. दरम्यान ‘मराठी बिग बॉस’ फेम अभिनेत्री हीना पांचाळ (Heena Panchal) हिने देखील लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, या दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताच हीना खूप ट्रोल झाली आहे (Heena Panchal troll on social media after posting corona vaccination video).

हीना पांचाळने नुकताच कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. लसीचं इंजेक्शन टोचून घेताना हीना प्रचंड घाबरलेली दिसली. लस घेतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यानंतर तिला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले.

पाहा हीनाचा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by HEENNAA PANCHAAL (@theofficialheena)

या व्हिडीओमध्ये अभिनेत्री हीना पांचाळ हिला एका नर्स लसीचे इंजेक्शन टोचताना दिसत आहे. यावेळी हीना प्रचंड घाबरलेली पाहायला मिळाली. मात्र, छोटंसं इंजेक्शन टोचून घेताना अभिनेत्री लटके नखरे पाहून नेटकरी चांगलेच वैतागलेले दिसले. इतकंच नाही तर इंजेक्शन घेऊन झाल्यानंतर देखील हीनाचे ही लटके-झटके सुरूच होते. यावर वैतागलेल्या नेटकऱ्यांनी तिला चांगलेच बोल सुनावले (Heena Panchal troll on social media after posting corona vaccination video).

काय म्हणाले नेटकरी?

हीना पांचाळने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताना त्याच्या बॅकग्राउंडला नेहा कक्करचे ‘ख्याल रखया कर’ हे गाणे लावले होते. यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले. काहींनी तिच्या या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये ‘ओव्हर ॲक्टिंगचे 50 रुपये कापा’ असे म्हटले आहे, तर काहींनी ‘इथे लोकांना लस मिळत नाहीयत, बराच काल वाट पहावी लागत आहे. यांना मिळते तर हे व्हिडीओ बनवत आहेत’ असे म्हटले आहे. एका युजरने चक्क ‘तू खूप शौर्याचं काम केलंस. तुला परमवीर चक्र मिळावे म्हणून शिफारस करतो’ असेही म्हटले आहे.

‘मराठी बिग बॉस’मुळे आली प्रसिद्धी झोतात

अभिनेत्रीं आणि मॉडेल म्हणून मनोरंजन विश्वात सक्रीय असणारी हीना ‘मराठी बिग बॉस’मुळे प्रसिद्धी झोतात आली होती. या स्पर्धेत वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेल्या हीनाने सगळ्या स्पर्धकांना तगडी टक्कर देत, स्वतःचे असे भक्कम स्थान निर्माण केले होते. या आधी देखील हीना अनेक गाण्यांमध्ये झळकली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री मलायका अरोराची ‘लूक-अ-लाईक’ म्हणून हीना खूप लोकप्रिय आहे.

(Heena Panchal troll on social media after posting corona vaccination video)

हेही वाचा :

PHOTO | अॅक्शनच नाही, तर रोमान्सचाही ‘बादशाह’ ठरला ‘डार्लिंग’ प्रभास! ‘या’ चित्रपटांनी वेडावली तरुणाई

इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भिडले कंगना रनौत आणि इरफान पठाण, एकमेकांवर कुरघोडी करत म्हणाले…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI