विष्णू शिंदे : वंचित कलावंतांच्या मानधनासाठी झटणारा गायक!

प्रसिद्ध गायक विष्णू शिंदे यांनी गायन क्षेत्राकडे केवळ करिअरचं साधन म्हणून पाहिलं नाही. पैसा मिळवण्याचं साधन म्हणूनही त्यांनी या कलेकडे पाहिलं नाही. (vishnu shinde)

विष्णू शिंदे : वंचित कलावंतांच्या मानधनासाठी झटणारा गायक!
vishnun shinde


मुंबई: प्रसिद्ध गायक विष्णू शिंदे यांनी गायन क्षेत्राकडे केवळ करिअरचं साधन म्हणून पाहिलं नाही. पैसा मिळवण्याचं साधन म्हणूनही त्यांनी या कलेकडे पाहिलं नाही. समाजप्रबोधनाचं हत्यार म्हणूनच त्यांनी गाण्याकडे पाहिलं. त्यामुळेच त्यांनी केवळ गायनापुरतं स्वत:ला मर्यादित राहिले नाहीत. तर, वंचित कलाकारांना मानधन मिळावं, त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून शिंदे यांनी सातत्याने प्रयत्न केले. (know details about dalit singer vishnu shinde)

सरकार दरबारी खेपा

कलावंतांना त्यांच्या वृद्धापकाळात जगण्याचं साधन मिळावं म्हणून त्यांनी सरकार दरबारी अनेकवेळा खेपा घातल्या. निवेदने दिली, मेळावे घेतले. मात्र, त्यांच्या मागण्या काही मान्य होऊ शकल्या नाहीत. उभ्याने गाणारे तमाशा कलावंत हेच खरे कलावंत आणि बसून गाणारे कलावंत हे आंबेडकरी कलावंत, असं वर्गीकरण 2007च्या दरम्यान तत्कालीन सरकारने केलं होतं. या वर्गीकरणामुळे आंबेडकरी कलावंत मानधनापासून वंचित राहिल्याचं ते सांगतात.

सरकारकडे पाच मागण्या

आंबेडकरी कलावंतांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी सरकारकडे पाच मागण्या केल्या होत्या. लोककलावंतांसाठी महामंडळ स्थापन करणे, महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद करणे, सांस्कृतिक खात्याचे मंत्रिपद कलावंतांना देणे, ज्यांना कलेचा वारसा नाही, अशांकडे हे मंत्रिपद देऊ नये. दलित मित्र आणि शाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार केवळ दलितांनाच देणे आणि कलावंतांच्या मानधनात पाचपटीने वाढ करणे आदी मागण्या त्यांनी केल्या होत्या. खरं तर या मागण्या नसून कलावंतांच्या व्यथाच असल्याचं ते सांगतात. पण या व्यथांना सरकारने अजूनही न्याय दिलेला नाही, अशी खंत ते व्यक्त करतात.

कलावंतांसाठी राज्यभर फिरले

या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून शिंदे यांनी चंद्रपूर, परभणी, यवतमाळ, नागपूर, वर्धा, बीड आणि नांदेडमध्ये हजारो कलावंतांचे मेळावही घेतले. तरीही त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही. सरकारने कलावंतांमध्ये भेद करतानाच त्यांना पुरस्कार देण्यातही दुजाभाव केल्याचा शिंदे यांनी आरोप केला होता. हृदयनाथ सिन्नरकर, प्रभाकर पोखरीकर, प्रतापसिंग बोदडे, चंद्रकला गायकवाड, सोपान कोकाटे, सुषमादेवी, मिलिंद शिंदे, बी. काशीनंद, प्रशांत अंबादे, यमराज पंडित, कुंदन कांबळे, लक्ष्मीदेवी, विश्वकांत महेशकर आणि रोशनबाबू सारख्या जुन्या कलावंतांना शासनाने पुरस्कार न दिल्याबद्दल ते खंत व्यक्त करतात. एवढेच नव्हे तर ते स्वत:ही शासकीय पुरस्कारांपासून वंचित राहिलेले आहेत.

समाधानी कलावंत

सर्वोच्च न्यायालयाने रात्री 10 नंतर ध्वनिक्षेपक लावण्यास मनाई केली आहे. कोर्टाच्या निर्णयाचा आदर आहे. पण त्यामुळे कलावंतांची रोजीरोटी गेल्याचं ते सांगतात. याबाबत सरकारने काही तरी मार्ग काढला पाहिजे, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. कलावंतांना न्याय देण्यासाठी संघर्ष करणारे शिंदेंची मात्र आंबेडकरी जनतेकडे काहीच तक्रार नाही. आंबेडकरी जनतेने आपल्याला भरभरून दिलं आहे. मानसन्मान दिला आहे. समाजाने जे दिलं तेच भरपूर असल्याचंही ते सांगतात. (साभार: आंबेडकरी कलावंत) (know details about dalit singer vishnu shinde)

संबंधित बातम्या:

मराठवाडा पेटलेला असतानाही समाजप्रबोधन; चळवळ्या गायक विष्णू शिंदे!

आजोबा-पणजोबा पोतराज, वडील चरित्र गायक, नोकरीचा कॉल फाडला; वाचा, विष्णू शिंदेंची कहाणी

पँथर ते बसपा… कार्यकर्ताही आणि कवी, गीतकारही…; असे होते हृदयनाथ सिन्नरकर

(know details about dalit singer vishnu shinde)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI